डिजिटल गावकरी न्युज
दुर्गाप्रसाद घरतकर
नमस्कार मंडळी प्रतापगड अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ऐतिहासिक स्थळ आहे, ज्यामध्ये दरवर्षी महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर भव्य यात्रा भरते. या यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात महादेवाचे दर्शन घेऊन जातात ज्यामुळे प्रतापगड हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक मानले जाते.
2025 च्या महाशिवरात्रीसाठी प्रतापगड महाशिवरात्री व्यवस्थापन अंतर्गत नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला सुर्वात होत आहे यात्रेच्या आयोजनासाठी ह्या महिन्यातील महाशिवरात्री यात्रा आणि ख्वाजा उस्मान गणी हारूनि उर्सच्या आयोजनाची पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
यात्रेला जाण्यासाठी गोंदिया वळसा हायवे वरून सुकळी फाट्यावरून प्रतापगड मार्ग मोकळा केलेला आहे पण हया रस्त्याची कामे चालु असून इथून जाणे येने अवघड होउ शकते. त्यामूळे भाविकांनी नवेगाव ते गोठनगाव या मार्गांनी यात्रेसाठी जावे जेणेकरुन कोणतीही अडचण येणार नाही त्याचबरोबरच अर्जूनी मोरगांव वरुन सुधा तूम्ही तिबेट वरुन प्रतापगड मार्गानें येऊ शकतात तोही रस्ता चांगला आहे त्यामुढे गाड्यांची गर्दी होणारं नाही याची दक्षता भाविकांनी घ्यावी .
यात्रेच्या दरम्यान, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले, ज्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश अधिकाऱ्याकडून दिला आहे आणि यात्रेला येताना स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे असे सुद्धा सांगितले आहे.
0 टिप्पण्या