खोखो महासंग्राम 2025 स्पर्धेत जिल्हा परिषद दवडीपार बाजार शाळा अव्वल
भंडारा : शहरातील सेंट पॉल शाळेच्या मैदानावर दिनांक 1 व 2 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या खो-खो महासंग्राम 2025 14 वर्षाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दवडीपार बाजार येथील विद्यार्थिनीने कौतुकास्पद कामगिरी करून प्रथम क्रमांक प्राप्त केला या स्पर्धेत मुलांमधून उत्कृष्ट खेळाडू म्हणून वंश संदीप ढोक व मुलींमधून नताशा विनोद नागोसे यांची निवड करण्यात आली.
या स्पर्धेत शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल सरपंच राजकिरण मेश्राम उपसरपंच अंतकला लांजेवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वपना गोस्वामी उपाध्यक्ष जयश्री धूर्वे केंद्रप्रमुख बी आर मेश्राम, बालरोगतज्ज्ञ यशवंत लांजेवार शाळेच्या मुख्याध्यापिका राधा चौधरी खो खो प्रशिक्षक खुशाल लांजेवार,अंजर शेख,वैभव मडावी,बेबीलता खांडेकर,अक्षद उईके, पदविधर शिक्षक परमेश्वर येणकीकर, सहाय्यक शिक्षक संतोष चव्हाण,भुवनकुमार मेश्राम तसेच ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.
0 टिप्पण्या