Digital Gaavkari News
भंडारा:- जिल्ह्यातील शांतीवन बुध्द विहार पाथरी (चिचाळ) येथे दि.27 व 28 फेब्रुवारी 2025 ला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाबोधी उपासक संघ नागपूर च्या विद्यमाने येथे दोन दिवसीय बुद्ध धम्म मेळावा आयोजित करण्यात आलेले आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2025 ला भिक्षू संघाचे व उपासक संघाचे 8.00 ते 9.30 भिक्षु संघाचे अल्पोहार व उपासक-उपासिकांचे भोजनदान त्याचप्रमाणे महापरित्राण पाठ रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत भदंत विनयबोधी महाथेरो व तथागत गौतम बुद्धांचा भिक्षु संघाच्या उपस्थितीत होणार आहे. 28 फेब्रुवारी 2025 ला 12 ते 1.30 वाजेच्या दरम्यान तथागत गौतम बुद्धाच्या पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण भदंत विनयबोधी महाथेरो , भदंत नागसेन महाथेरो, भदंत प्रशिलरत्न गौतम, भदंत रत्नसार,भदंत मेत्तानंद , भदंत संघानंद, सदानंद श्रामनेर बुद्धपाल, भिक्षुनी पट्टाचार्य, व संपूर्ण भिक्षु संघाच्या उपस्थितीत होणार आहे . 1.30 ते 4 वाजेपर्यंत तीन अंकी रमाई नाटक सादर करण्यात येणार आहे.
भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रांचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे व आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा दि.28 फेब्रुवारी ला सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत संत तुकाराम, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहेत. संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन भंडारा पवनी विधानसभेचे विधायक नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे राहणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. कविताताई जगदीश उईके, दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर ,डॉ मधुकर रंगारी ऍड.विरेंद्र जयस्वाल मुख्य संपादक दैनिक कशिष गोंदिया , कवी व साहित्यिक मकरंद पाटील जळगाव हे उपस्थित राहतील .तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे,प्रेस संपादक संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे , अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे ,भारत तिबेट मैत्री संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अमृत बनसोड , महाराष्ट्र शासन,समाज भूषण पुरस्कार प्राप्त डी .जी .रंगारी , चिचाळ येथील सरपंच मधुसूदन काटेखाये, पंचायत समिती सदस्य सविता बिलवणे, पंचायत समिती सदस्य सुवर्णाताई रामटेके ,धम्म प्रचारक लिमचंद बौद्ध,तुळशीदास गवळीकर, कुसुमताई गवळीकर, भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर, प्रा. राजेश नंदपुरे , राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे , सामाजिक कार्यकर्ते असित बागडे, सामाजिक कार्यकर्ते सरोज खोब्रागडे,सामाजिक कार्यकर्त्या निमाताई रंगारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत वैशाली मडावी नृत्यांगना यांचे भिम गित, रमाई गीत सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत यवतमाळ चे राष्ट्रीय युवा प्रबोधनकार राज रामरावजी घुमनर कांदळी व वर्धा चे सप्त खंजेरी वादक भाऊसाहेब थुटे यांच्या संपूर्ण संचासहित प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. वरील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शांतीवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध ,शांतीवन बुद्धविहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध , अश्विन मेश्राम, निखिल जीवतोडे, विनायक ढोके, गंगाधर गजभिये, खेमराज चवरे यांनी केलेले आहे.
0 टिप्पण्या