Digital Gaavkari in
Durgaprasad Gharatkar
मंडळी आजपर्यंत शेतकऱ्यांना आपलं शेतीचं कोणतही काम करायचं असेल कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा सरकारकडून नुकसान भरपाई मिळवायची असेल तर महसूल विभागात अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या यात सरकारी काम आणि 12 महिने थांब हे तर होतंच शिवाय पाकीट नसेल तर काम होईल की नाही याची कुणालाही गॅरंटी नव्हती आणि याच सगळ्या गोष्टींमुळे आधीच निसर्गाची अवकृपा अपूर्ण उत्पन्न आणि इतर अनेक समस्यांचा सामना करत असलेला शेतकरी अजूनच खचून जात होता त्याची पिळवणूक होत होती आणि या सगळ्याचाच विचार करून या गोष्टी रोखण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी फार्मर आयडी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र तयार करण्याचा निर्णय घेतला असून या ओळखपत्रामुळे तुम्हाला आपलं जसं आधार कार्ड असतं तसंच एक फार्मर आयडी कार्ड मिळेल आणि या आयडी कार्डचा फायदा हा असा असेल की तुमचं शेतकरी म्हणून अधिकृत डिजिटल ओळखपत्र असेल आणि यामुळे तुम्हाला विविध सरकारी योजनांचा लाभ पीक विमा नुकसान भरपाई जमिनीचे व्यवहार आणि इतर वेळोवेळी येणाऱ्या सरकारच्या योजना या सगळ्या गोष्टी मिळणं सहज आणि सोपं होईल शिवाय महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला आधी सारखं प्रत्येक योजनेसाठी डॉक्युमेंट्स गोळा करणं सरकारी कार्यालयात हेलपाटा मारणं हे सगळं बंद होणार असून या एका आयडी कार्डमुळे शेतकरी म्हणून तुमची डिजिटल ओळख होऊन विविध योजनांचे पैसे तुमच्या खात्यात डायरेक्ट जमा होतील.
त्यामुळे भ्रष्टाचारी यंत्रणेकडून तुमची होणारी लूट थांबेल शिवाय इतरही अनेक प्रॉब्लेम सॉल्व होतील मंडळी शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी अतिशय उपयुक्त असणार हे फार्मर आयडी कार्ड नेमकं काढायचं कसं त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात आणि याचे शेतकऱ्यांना नेमके काय फायदे होणार आहेत हेच आपण आजच्या या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत.
Farmer ID Card शेतकरी ओळखपत्र काढण्याची प्रक्रिया आणीं कागदपत्रे
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र (Farmer ID Card ) मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामुळे विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे सुलभ होते.हे ओळखपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'आपले सरकार' आणि 'महाडीबीटी' या पोर्टल्सद्वारे ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे.
आपले सरकार पोर्टलद्वारे नोंदणी प्रक्रिया
पहिल्यांदा या पोर्टलला भेट द्या: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
नोंदणी करा: जर आपण नवीन वापरकर्ता असाल, तर 'नवीन वापरकर्ता नोंदणी' (New User Registration) वर क्लिक करा.
आवश्यक माहिती भरा: आपले आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी इत्यादी माहिती प्रविष्ट करा.
लॉगिन करा: नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, आपल्या यूजर आयडी आणि पासवर्डद्वारे पोर्टलवर लॉगिन करा.
शेतकरी असल्याचा दाखला अर्ज: 'शेतकरी असल्याचा दाखला' या सेवेसाठी अर्ज करा.
आणि त्यानंतर कागदपत्र अपलोड करा.
Farmer ID साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
आधार कार्ड
7/12 उतारा
बँक पासबुकची प्रत
पासपोर्ट आकाराचा फोटो
नोंदणी प्रक्रियेदरम्यान, आपला आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक अचूक असल्याची खात्री करा, कारण यावर ओटीपी येईल.नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला शेतकरी ओळखपत्र डाउनलोड करता येईल. ज्याद्वारे आपण विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी, आपण आपल्या तालुक्याच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा वरील पोर्टल्सना भेट देऊ शकता.
आधार कार्ड
7/12 उतारा
बँक पासबुकची प्रत
पासपोर्ट आकाराचा फोटो
नोंदणी प्रक्रियेदरम्यान, आपला आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक अचूक असल्याची खात्री करा, कारण यावर ओटीपी येईल.नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला शेतकरी ओळखपत्र डाउनलोड करता येईल. ज्याद्वारे आपण विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी, आपण आपल्या तालुक्याच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा वरील पोर्टल्सना भेट देऊ शकता.
0 टिप्पण्या