सायबर चोरांनी ११ कोटी रुपये लुटले Digital Arrest च्या नादात झाले भिकारी.


देशात ऑनलाईन फ्रॉडचे वाढते प्रमाण – ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीचा नवा प्रकार काय आहे वाचा.

डिजिटल गावकरी
Durgaprasad Gharatkar

नमस्कार मंडळी आपल्या देशात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण भयंकर वाढले आहे. ऑनलाईन तंत्रज्ञान व्यवहार सोपे करत असले तरी त्याचे तोटेही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत. सध्या सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची नवीन फसवणूक सुरू केली आहे. याच माध्यमातून बंगळुरूमधील एका आयटी प्रोफेशनलला तब्बल 11 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला. हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे आणि कसा घडला हे जाणून घेऊया.

बंगळुरूमधील आयटी प्रोफेशनलला 11 कोटींचा गंडा

बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम करणाऱ्या विजय कुमार (वय 39) याला ऑनलाईन फसवणुकीचा फटका बसला. त्याने 10 वर्षांपूर्वी शेअर मार्केटमध्ये 50 लाख रुपये गुंतवले होते आणि त्यावर 11 कोटींची कमाई केली होती. मात्र, सायबर गुन्हेगारांनी त्याच्यावर डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून दबाव टाकून हे पैसे हडपले. त्यानंतर ही रक्कम हवाल्याद्वारे परदेशात वळवण्यात आली बंगळुरू पोलिसांनी त्वरित कारवाई करत मोठा भाग वाचवला.

सायबर गुन्हेगारांची नवी पद्धत – डिजिटल अरेस्ट काय आहे

हा घोटाळा 11 नोव्हेंबर 2024 रोजी सुरू झाला. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या नावाने विजय कुमारला फोन आला. त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर अवैध जाहिरातींसाठी केल्याचे सांगण्यात आले. तसेच, त्याच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल असल्याचेही सांगून दबाव टाकण्यात आला. पुढे, नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने त्याच्या नावावर सहा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे सांगून त्याला घाबरवण्यात आले.

सायबर गुन्हेगारांनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून विजय कुमार आणि त्याच्या कुटुंबीयांवर अटकेचा धोका असल्याचे भासवले. पुढील काही आठवड्यांत ऑनलाईन सुनावणी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटला चालवला गेल्याचा बनाव करण्यात आला. शेवटी, विजय कुमार घाबरून 11.83 कोटी रुपये गुन्हेगारांच्या खात्यात ट्रान्सफर केले.

गुन्हेगारांचा पर्दाफाश आणि अटक

12 डिसेंबर 2024 रोजी विजय कुमारने पोलीस ठाणे गाठले आणि हा घोटाळा उघडकीस आला. बंगळुरू पोलिसांनी तपास करून 75 कोटी रुपये परत मिळवले. सायबर गुन्हेगार करण (वय 24, गुजरात), तरुण नतानी (वय 26, दिल्ली), आणि धवलभाई शहा (वय 35, गुजरात) यांना अटक करण्यात आली. हा स्कॅम दुबईतून ऑपरेट केला जात असल्याचेही उघड झाले.

सायबर फसवणुकीपासून सावधान राहा

अनोळखी कॉल्स आणि व्हिडिओ कॉल्स उचलू नका.

कोणत्याही परिस्थितीत ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

कोणी पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकारी असल्याचा दावा करत असेल, तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन खात्री करा.

बँक आणि अधिकृत संस्थांकडून मिळणाऱ्या मेसेज आणि ईमेलची योग्य शहानिशा करा.

डिजिटल अरेस्ट हा एक नवा स्कॅम आहे, त्यामुळे सावधान राहा आणि कोणत्याही संशयास्पद गोष्टी त्वरित पोलिसांना कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या