लाखनी :-.संत एका जातीचे नसून संपूर्ण समाजाचे मार्गदर्शक असतात. संतांना जातीच्या बंधनात अडकवू नये असे मत डॉ.छत्रपाल लांबकाने यांनी मांडले ते आज दिनांक २१ जानेवारीला तुकाराम महाराज जयंतीच्या कार्यक्रमात व महिला मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्था लाखनीच्या वतीने संत तुकाराम सभागृहात तुकाराम महाराज जयंती उत्सव व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयकृष्ण फेंडरकर,प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ.छत्रपाल लांबकाने, विशेष अतिथी महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये,प्रमुख पाहुणे जि प सदस्य डॉ. मनिषाताई निंबार्ते,माजी पंचायत समिती सभापती प्रणाली सार्वे,गडेगावच्या सरपंच वर्षा रेहपाडे,उमरावजी आठोळे,रामदास सार्वे,माधवराव भोयर, गंगाधर लुटे,विचारपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात तुकाराममहाराजांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून झाली. याप्रसंगी सभापती स्वाती वाघाये आणि जि प सदस्य डॉ.मनिषा निंबार्ते यांनी महिला मेळाव्यानिमित्त महिलांना मार्गदर्शन केले.जयंतीचे औचित्य साधून महिलांना हळदी -कुंकू व वाण वाटप करण्यात आले. संत तुकाराम सभागृहात संपन्न झालेल्या जयंती उत्सव व महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाचे संचालन स्मिता सिंगनजुडे,प्रास्ताविक उमेश सिंगनजुडे तर आभार उमरावजी आठोळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश रोटके, श्रीकांत नागलवाडे, भीष्म लांडगे,कोमल वाघाये,अर्चना ढेंगे, सैला सार्वे, सारिका रेहपाडे,वनिता चौधरी, नितेश टिचकुले, नाना राघोर्ते, कैलास लुटे, दुर्गा अतकरी,प्रा.उमेश रेहपाडे, दिलीप कायते, निलेश गाढवे,प्रा. शिवचरण धांडे,लाला कातोरे , हिरामण वाघाये, दामोधर काळे,अशोक धांडे,प्रा. चंद्रशेखर झलके, प्रशांत सिंगनजुडे,ज्ञानेश्वर लांडगे,दिलीप नागलवाडे , विलास टिचकुले,अशोक हजारे, टोलीराम सार्वे,प्रा. निलेश चोले,प्रा. जागेश्वर वाघाये,आनंद उरकुडे .रामभाऊ राघोर्ते,यादोराव घोनमोडे,भाष्कर गरपडे, लेखराम कातोरे ,नाना वाघाये, भजनदास सेलोकर, धनराज तितरमारे,खेमराज तिजारे मधुकर राघोर्ते, मंगेश धांडे, श्रीकांत सपाटे,पराग पाटील ठवकर मचारना,ज्ञानेश्वर लुटे,संतोष सिंगनजुडे,किरण नांदगावे,सुहास टिचकुले,डॉ. सुधाकरजी शेंडे,तिलकचंद हलमारे,उमेश कोर्राम,संजय वनवे,नागेश वाघाये,विजयेंद्र लांजेवार,हिवराज कमाने, प्रतिभा निंबार्ते, चेतना रेहपाडे, रिता धांडे, भारती राघोर्ते, हर्षदा कमाने,अलका लुटे, शुभांगी लुटे,संगीता वाघाये यांनी विशेष परिश्रम घेतले.येथे संत तुकाराम महाराज जयंती व महिला मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.
0 टिप्पण्या