लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर हफ्ता जमा | ladki bahin yojana December installment 2024 .


डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर


ladki bahin yojana December installment 2024: नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता आता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २४ डिसेंबर पासून ३१ डिसेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सूर्वात झाली आहे त्यामुळे ज्या महिलांना आतापर्यंत हप्ता मिळालेला नाही, त्यांनाही पैसे लवकरच मिळतील.

महायुती सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे "मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना". यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २ कोटी ३४ लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. महिलांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार सीडिंग अनिवार्य होतं, परंतु आता त्या महिलांसाठी सुद्धा या योजनेचा लाभ मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आजपासून १२ लाख महिलांना लाभ वितरित करण्यात येईल, आणि पुढील ४-५ दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यांनी हा लाभ इतर महिलांना वितरित केला जाईल. तसेच, सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवणाऱ्या महिलांना ह्या निधीचा वापर आपल्या कुटुंबासाठी, आरोग्य, उद्योगधंदे किंवा वैयक्तिक जीवन सुधारण्यासाठी करण्यात यावा, अशी विनंती आहे.

याशिवाय, मी सर्व मातेसंमातर बहिणींना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या पुढील योजनेसाठी आणि जीवनासाठी हा निधी उपयुक्त ठरेल, याची खात्री आहे.

धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या