Digital Gaavkari News
भंडारा :- जिल्हा परिषद भंडारा चे प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात दि.20ते 31 डिसेंबर या कालावधीत निपुण उत्सव साजरा करण्यात येत आहे.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती, व विशेष शिक्षक यांचे मार्फत उद्बोधन करण्यात येत आहे. यावेळी आयडिया कृतीतील गमती जमतीत चांगलेच रमले असल्याचे सिल्ली येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेसह इतरही शाळेत दिसून आले.
या उपक्रमात लिडर माता व माता पालक गटांच्या सदस्यासोबत साप्ताहिक मिटिंग माता गटांची शालेय मासिक कार्यशाळा, आयडीया व्हीडीओ इत्यादी विषयावर चर्चा करन्यात आली. या माता पालक गटाच्या भेटीच्या संकलीत अहवालावर तालुका स्तरावर चर्चा करण्यात येणार असून प्रत्येक गावात वाडी, वस्ती येथे माता पालक गट तयार करणे या वर्षामधील इयत्ता १ ली माता या गटामध्ये सहभागी करण्यात येणार आहे.
प्रत्येक माता पालक गटाला प्रत्येक आठवड्यास आयडीया व्हीडीओ मिळनार आहे . गावातील सर्व माता पालक गट आठवड्यातून किमान एकदा भेटून आयडीया व्हीडीओ मध्ये सांगीतल्या प्रमाणे काम करने अपेक्षीत आहे.आपल्या मुलाने निपुण व्हावे या बदल मातांना जागरूक करणे. माता पालक गटासोबत भेटी देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी आयडीया व्हीडीओ मधील काही आयडिया कृती करुन दाखवन्याचे निर्देश आहेत. शिक्षक व इतर मंडळी या माता पालक गटांना मदत मिळाली पाहिजे.प्रत्येक शाळेत निपुन प्रतिज्ञा व निपुनची उदिष्ट लावण्यात आली असने आवश्यक आहे.. त्याच्या गटात काय काय गंमती जंमती होत असल्यास गट भेटीदरम्यान गटाचे काम दाखविणारे निवडक फोटो, व्हिडिओ त्यांच्या परवानगीने राज्य स्तरावरील लिंक वर सादर करण्यात येत आहेत.
आतापर्यंत भंडारा गटातील सिल्ली, सोनुली, दाभा, दवडीपार बेला, बासोरा, टाकळी, पहेला, मानेगाव,बोरगाव,खुटसावरी,गराडा इत्यादी ठिकाणच्या मातागटांना, लीडर मातांना गट साधन केंद्रातील केंद्र प्रमुख भीमराव मेश्राम, राजश्री शिंदे, पुष्पलता भोयर, साधनव्यक्ती राम वाडिभस्मे, अश्विन रामटेके, संपदा लाखडे, हेमलता नागदेवे, वनिता कोरे, अरुण झुरमुरे,विशेष शिक्षिका अनुराधा हुमणे,ज्योत्स्ना नेपाले,संघमित्रा कानेकर,चंद्र शेखर डुंभरे, अंजू गडपाल, संगीता चकोले, मंगला धांडे, जयेश्री तिरपूडे यांनी विविध शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसह भेटी दिल्यात व मातांना मार्गदर्शन केले.
0 टिप्पण्या