लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूलमध्ये " भ्रष्टाचार मुक्त भारत"कार्यक्रम



लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूलमध्ये " भ्रष्टाचार मुक्त भारत"कार्यक्रम

नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी

भंडारा :-लाखनीतील लिटिल फ्लावर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विध्यार्थ्यानी अनोखा भ्रष्टाचार मुक्त भारत कार्यक्रम सादर केला. या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे, वक्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष अश्या विविध भूमिका विद्यार्थ्यांनी सादर करून,विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार मुक्त भारताची शिकवण दिली.

भारतात भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. दिवसेंदिवस भ्रष्टाचाराची कीड प्रशासन व्यवस्थेला पोखरत आहे परिणामी भारत विकसित राष्ट्र निर्माण होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. याची जाणीव विद्यार्थ्यामध्ये व्हावी व त्यांच्यात नैतिकता व संस्कारचे मूल्य रुजविता यावेत यासाठी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार मुक्त भारत हा कार्यक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी सम्यक जनबंधु, प्रमुख वक्ते कु. अनघा आठवले तर प्रमुख अतिथी तनुज सयाम विचारपीठावर उपस्थित होते.या प्रसंगी शर्वरी बावनकुळे हिने विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार न करण्याची शपथ दिली तर विद्यार्थ्यांनी भविष्यात भ्रष्टाचार न करण्याचे शिक्षकांना अभिवाचन दिले.

कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक अर्णव सिंगनजुडे, आभार युगांत लांजेवार याने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवांशी आठवले, संचिता वाघाये, अतिथी मांढरे, पूर्वेश वंजारी, तीर्थराज निर्वाण या विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या