आदिवासीं मुला- मुलींचे वसतिगृह अर्जुनी मोर येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संप्पन.


डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर


दिनांक 24 डिसेंबर 2024 ला अर्जुनी मोरगाव येथील आदिवासी मुला -मुलींच्या वसतिगृहात वार्षिक स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमात वसतिगृहातील विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांचे मन जिंकले कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी नृत्य, गाणी, वेशभूषा स्पर्धा तसेच सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या विविध कला सादर केल्या.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.उमेश काशिद सर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ. समिताताई कोडापे सभापती पं.स.अर्जुनी मोरगाव, प्रमुख अतिथी मा.श्री.देशमुख सर, प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.सांगोडे मॅडम अर्जुनी मोर, उपाध्यक्ष मा.सौ भाग्यश्री ताई सयाम सदस्य पं.स.अर्जुनी मोर, मा.राहुल येल्ले आदिवासीं विद्यार्थी संघ गोंदिया, मा.कुंडलिक मारगाये सर सेवानिवृत्त, प्रमूख अतिथी मा .श्री भोयर सर मानवता विद्यालय बोंडगाव देवी, मा.संचित वाळवे सर अर्जुनी मोर, मा.श्री अजय कोल्हाटकर सर गृहपाल आदी.मुलांचे वसतिगृह अर्जुनी मोर, मा.सौ ललिता टेंभरे मॅडम गृहपाल आदी.मुलींचे वसतिगृह अर्जुनी मोर, तसेच प्रमुख अतिथी मा . मडावी सर अर्जुनी मोर , प्रमुखं अतिथी मुन्ना कोसमे बिर्सा ब्रिगेड गोंदिया, कमलेश मारगाये आदिवासीं विद्यार्थी संघ गोंदिया, मा.प्रशांतजी पाठेकर,देवेंद्र म्हारस्कोल्हे आदिवसी विद्यार्थी संघ, रामुजी करपते, मा मुलीचे वसतिगृह सेवानिवृत्त गेडाम मॅडम तसेच आदिवासीं मुला मुलींचे वसिगृह कर्मचारी मा.श्री भेंडारकरजी , मा.नरेंद्र नाईक, मा.दिगांबर घरतकर, मा.शुभम कोल्हाटकर विदयार्थी प्रतिनिधी जालेंधर मडावी , विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. रजनी मारगाये इत्यादि पावणे कार्यक्रमाला उपस्थित होते.

मा.संचित वाढवे सर अर्जुनीत्यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाबद्दल तसेच एमपीएससी यूपीएससी परीक्षा, तसेच आदिवासीं विद्यार्थीनी विवध योजनाचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.त्याचबरोबर .श्री.उमेश काशिद सर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांनी आदिवासीं विद्यार्थीनी विवध आदिवासी विकास प्रकल्पची सुविधांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले आणि आदिवासीं समाजाच्या मुले मुली ह्या चांगल्या पदावर जाऊन आपल्या आईवडिलांच्या नाव मोठे करुण दाखवावे असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या भाषणातून केलें

कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थिनींनी सादर केलेला पारंपरिक नृत्यप्रकार आणि स्थानिक आदिवासी जीवनशैलीचे प्रतिबिंब त्यांच्या नृत्यात दिसत होते विद्यार्थिनींनी या कार्यक्रमादरम्यान आपले कौशल्य दाखवून अभिमान व्यक्त केला आणि अशा कार्यक्रमांमुळे आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी पावणांच्या हातून सर्व सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे व बक्षिसे देण्यात आली व त्यांचा गौरव करण्यात आला वसतिगृहाच्या व्यवस्थापनाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या