डिजिटल गावकरी
नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी
भंडारा :- मदत सामाजिक संस्था नागपूर तर्फे गुरुदेव सेवाश्रम नागपूर येथे सामाजिक ,शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात आयोजित 22 वे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलनात संमेलना अध्यक्ष गिरीश पांडव , अध्यक्ष एड. नील लाडे , सचिव दिनेश वाघमारे , अनिल मेश्राम सामाजिक कार्यकर्ता सडक अर्जुनी , भगवान नंदागवळी तलाठी नवेगाव यांचे हस्ते 2024 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्काराने सन्मानित गौरविण्यात आले ... समता बंधुता व राष्ट्रीय अखंडता टिकविण्यासाठी जागृत प्रहरी म्हणून सदैव कार्यरत राहावे .. अश्विनी दिलिप भिवगडे यांचे तर्फे करण्यात येणारे कार्य , तळमळ व अनुभवाचा लाभ आज प्रबोधन कार्यात व्हावा याकरिता भावी आयुष्यातील यशस्वी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा ही देण्यात आल्यात ... या प्रसंगी सन्मानचिन्ह , सन्मानपत्र, गुलाब पुष्प , व तिरंगा प्रणित दुपट्टा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .....
या सत्कार प्रति अश्विनी भिवगडे यांनी सामाजिक मदत संस्था नागपूर व समाज बंधु भगिनींचे मनस्वी आभार मानले ...
समाज कुणाच्याही चांगल्या कार्याची दखल घेत असतो , माझ्याही अल्पशा सामाजिक कार्याची दखल घेण्यात आली या बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली....
0 टिप्पण्या