नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी
भंडारा :- लाखनी तालुक्यातील इसापुर येथे झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मचारणा येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
क्रीडा स्पर्धेतील कामगिरी:
माध्यमिक गट (मुलं): कबड्डी आणि खो-खो – *प्रथम क्रमांक (तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र
माध्यमिक गट (मुली): कबड्डी आणि खो-खो – *प्रथम क्रमांक (तालुकास्तरीय फेरीसाठी पात्र
प्राथमिक गट: ( मुले )कबड्डी आणि खो-खो – द्वितीय क्रमांक
वैयक्तिक स्पर्धा
माध्यमिक मुले:
100 मीटर धावणे: प्रथम – मानव श्यामलाल किनाके | द्वितीय – यश आदेश लांजेवार
लांब उडी: प्रथम – यश आदेश लांजेवार (वर्ग 7)
माध्यमिक मुली:
100 मीटर धावणे: द्वितीय क्रमांक– आरुषी मनोज कातोरे
प्राथमिक मुले
100 मीटर धावणे: प्रथम क्रमांक – समर्थ. सोमेश्वर कुथे | द्वितीय क्रमांक – धवल लेखराम लांजेवार*
प्राथमिक मुली:
100 मीटर धावणे: द्वितीय क्रमांक – जानवी अजय घोनमोडे*
सांस्कृतिक स्पर्धा
माध्यमिक गट नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक
विद्यार्थ्यांच्या मेहनतीला मुख्याध्यापक सुभाष काळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन, तसेच विजय चेटुले, करुणा मेश्राम, आणि गोंधोळे मॅडम यांनी चमू मार्गदर्शक म्हणून विशेष भूमिका बजावली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे परिश्रम, गावकऱ्यांचे आणि पालकांचे प्रोत्साहन मिळाले. मचारणा शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेली कामगिरी संपूर्ण शाळेसाठी, गावासाठी अभिमानाची बाब आहे. तालुकास्तरीय फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
0 टिप्पण्या