भंडारा जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यटण स्थळ बंद ठेवण्याचे निर्देश.


डिजिटल गावकरी 

भंडारा :- जिल्ह्यातील नैसर्गीक पर्यटन स्थळांवर करडी नजर राहणार असून 31डिसेंबर2024 व 1 जानेवारी 2025 ला पर्यटण स्थळावर कोणतेही अनुचीत प्रकार घडू नये व नैसर्गिक संपत्तीची हानी, व बदनामी होऊ नये म्हणून नैसर्गिक पर्यटन स्थळ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा वण उपसंरक्षक कार्यालयाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे 31डिसेंबर साजरा करू पाहणाऱ्यांची मन हिरमुसले असल्याचे दिसून आले.

भंडारा येथून जवळच रावणवाडीचा विकास आराखडा तयार झाल्यापासून पर्यटनवाढीसाठी जमेच्या बाजू असताना 31 डिसेंबर व 1 जानेवारी ला विपुल वनसंपदा, वन्यप्राणी, गोसेखुर्द धरण या पर्यटनवाढीसाठी गर्दी उसळनार होनार असताना भंडारा जिल्ह्यात वण विकासाच्या माध्यमातून भंडाऱ्यात जलपर्यटनाच्या निमित्ताने आशेचा किरण गवसला आहे. जलपर्यटनासाठी पहिल्या टप्प्यात 102 कोटी रूपये मंजूर झाले असून येत्या काही वर्षात जलपर्यटनाच्या माध्यमातून भंडारा जिल्हा जगाच्या नकाशावर अधोरेखित होणार आहे मात्र आता अश्या पर्यटन स्थळांवर आनंद लुटण्याची संधी गमावल्याने अनेकांची मने हिरमुसले आहे.

अनेक देशात काही राज्यांची अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. वैनगंगा नदीवर ही परिस्थिती अनुरूप असल्यामुळे याठिकाणी 'टुरिझम सर्किट' विकसित करता येऊ शकते. हे लक्षात येताच राज्याच्या पर्यटन मंत्राल्याने वैनगंगा नदीपात्रात गोसेखुर्द धरणामुळे जलपर्यटनाची योजना आखली. या योजनेला निधीही उपलब्ध झाली असली तरी . जलपर्यटन क्षेत्रात बोटींग सुविधा व बोटीमध्ये मुक्कामाची सुविधा, त्यात दर्जेदार रेस्टारेंट असे जागतिक दर्जाची सुविधा राहणार आहे. याकडे पर्यटक आकर्षित होऊन जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे स्वप्न भंडारा वासी पहात आहे. रावणवाडीतही वाढणार पर्यटनः निसर्गाच्या कुशीत, विस्तीर्ण जलाशय लाभलेल्या रावणवाडीला पर्यटनस्थळाच्या नकाशावर आणण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असून. सद्यस्थितीत रावणवाडी पर्यटकांसाठी आवडीचे ठिकाण आहे.पण 31डिसेंबर व एक जानेवारीला पर्यटन अवकाश असल्याने सदर रावणवाडी पर्यटन स्थळांवर 31 डिसेंबर साजरा करण्याचे आवाहन संयुक्त वण हक्क समिती अध्यक्ष जगदीश उईके , वण हक्क समिती सचिव विजय राऊत उपाध्यक्ष कार्तिक सिडाम व समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या