स्वसंरक्षणासाठी सावधानता व संयम महत्त्वाचा - पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव.


"समर्थ महाविद्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन"

नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी

भंडारा :- लाखनी येथील समर्थ महाविद्यालयात मुलींच्या सुरक्षिततेसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी महाविद्यालयाच्या भगिनी निवेदिता सभागृहात विद्यार्थिनी विशेष उपक्रम, महिला तक्रार निवारण समिती व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या प्रसंगी उद्घाटन पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे होते. प्रशिक्षक ज्ञानेश्वर गिऱ्हेपुंजे यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.

पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासाठी सतर्कता आणि संयमाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि व्यसनांपासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा नियमित लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात प्रा. धनंजय गिऱ्हेपुंजे, डॉ. सुनंदा देशपांडे आणि डॉ. संगीता हाडगे यांची मंचावर उपस्थिती लाभली. प्रा. स्वाती नवले यांनी कार्यक्रमाचे संचालन संचालन केले, तर प्रास्ताविक डॉ. सुनंदा देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता डॉ. संगीता हाडगे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. यावेळी प्रा बाळकृष्ण रामटेके, डॉ सुरेश बंसपाल, प्रा. लालचंद मेश्राम, डॉ संदीप सरेय्या, डॉ धनंजय गभने, डॉ बंडू चौधरी, प्रा. अजिंक्य भांडारकर, प्रा. मिलिंद कांबळे, प्रा. डॉ सुनील देशमुख, डॉ स्मिता गजभिये, प्रा रुपाली खेडीकर, प्रा मनीषा मदनकर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षेबाबत जागरूक करत आत्मसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करण्याची प्रेरणा देण्यात आली. महाविद्यालयात अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन होणार असल्याने विद्यार्थिनींना मोठा लाभ होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या