
भंडारा:- येथून जवळच असलेल्या अर्जुनी (पुनर्वसन ) गिरोला येथील ग्रामपंचायत येथे नुकतीच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले. या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष स्थानी संदेश हेमराज पडोळे तर निमंत्रक म्हणुन पोलिस पाटील विजय राघोर्ते यांची निवड करण्यात आली तर कार्यकारी मंळात सरपंच चेतन राघोर्ते,उपसरपंच शेषराज रामटेके, आकाश शेंडे संजय शेंडे, रमेश पडोळे, शालीनी शेंडे, कविता टांगले सोपानु गोंडाणे, कृपान राघोर्ते, मुख्याध्यापिका पुष्पा सपाटे, सुरज तुंबरे, बीट जमादार विकास जाधव,तलाठी विठल फंके, ग्रामसेवक गोपाल बुरडे, जाख पोलिस पाटील सुभाष पडोळे आदींचा समावेश आहे.
0 टिप्पण्या