जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग भंडारा यांना निवेदनातून मागणी
Digital Gaavkari news
नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी
भंडारा :- पवनी तालुक्यातील कातूर्ली नं 2 राज्यस्तरिय तलावाच्या गेट मधून मोठया प्रमाणात पाणी लिकेज होत आहे. त्यामुळे गेट खालील शेतात आजही मोठया प्रमाणात पाणी साचलेले आहे. त्यामुळे लागवड केलेल्या धान पिकांची कापणी व मळणी कशी करायची हा गंभीर प्रश्न असून यात शेतपिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. संबंधित गेट मधून लिकेज होणारे पाणी बंद करण्यात यावे. अशी मागणी विरली /खंदार येथील शेतकरी राजकुमार मुखळू गडपायले यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग भंडारा यांना निवेदनातून केली आहे. लिकेज पाणी बंद नं केल्यास आमरण उपोषणावर बसण्याचा इशाराही पिढीत शेतकऱ्यांनी दिला आहे.
प्राप्त निवेदनानुसार, मुखळू गंभीरा गडपायले रा. विरली /खंदार यांना मौजा कातूर्ली गट क्र 179/57 एकूण आराजी 1.00 हे आर शेत जमीन शासनाकडून को वी भा सू मोहबशी ना त भंडारा रा. मा. क्र.37/346/1969-70 अन्वये काबीलकास्त जमीन कास्तकारी करण्याकरिता दि 13/2/1976-77 ला देण्यात आली. तेव्हापासून शेतजमिनीत उत्पादन घेत आहे. वडील मुखळू गडपायले हे सन 2005 मध्ये मरण पावले. तेव्हापासून त्यांचा मुलगा राजकुमार गडपायले हे शेती करीत आहेत. यावर्षी राजकुमार यांनी शेतात भारी धान पिकांची लागवड केली असून सन 2023-24 या वर्षात 1 महिन्याआधी धानपिकासाठी तलावाचे पाणी सोडण्यात आले. पाणी वाटप झाले. तलावाची गेट बंद करण्यात आली. मात्र बंद गेट मधून मोठया प्रमाणात पाणी लिकेज होत असल्याने ते सर्व पाणी शेतात जमा होवून धान पिकाचे नुकसान होत आहे. तलावाच्या मुख्य नहराकरिता पिढीत शेतकऱ्यांची 17आर 50 मीटर जागा संपादित झाली असून गेट मधून लिकेज होत असलेले पाणी नहरद्वारे येऊन शेतात जमा होत आहे. त्यामुळे धान पिकांची कापणी व मळणी करता येत नाही. शेतात चिखलमुळे ट्रॅक्टर अथवा मशीन नेता येत नाही. याची माहिती पाणी वाटप समितीला देण्यात आली. मात्र तेही याकडे लक्ष नं देता अरेरावीच्या भाषेत बोलून उडवाउडावीचे उत्तर देतात. सदर शेती ही जंगलव्याप्त परिसरात असून हिंस्त्र पशुचा मोठया प्रमानात संचार आहे. त्यामुळे धान पिकाचे नुकसान झाल्यास याला जबाबदार कोण? संबंधित गेट मधून लिकेज होणारे पाणी बंद करण्यात यावे. म्हणून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग भंडारा यांना दि.21 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आली. मात्र अजूनही दखल घेण्यात आली नाही. वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन मला न्याय द्यावे.8 दिवसात गेटमधून लिकेज होणारे पाणी बंद न करण्यात आल्यास आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा राजकुमार गडपायले यांनी निवेदनातून दिला आहे.
0 टिप्पण्या