गावामधे प्रचारासाठी लोक येतात पण उमेदवार का नाही - दुर्गाप्रसाद घरतकर.

 

डिजिटल गावकरी न्यूज 
टीम डिजिटल गा.

अर्जुनी मोरगाव : गोंदिया आणि आमगाव देवरी या तिरोडा चारही मतदारसंघांत बंडखोरीचे वातावरण आले आहे. महायुतीला  डोकेदुखी वाढली आहे. विधानसभेच्या रिंगणात अनेक उमेदवार मोठ्या जोमाने उतरले आहेत. मात्र सामान्य माणसांनी विधानसभेच्या निवडणुकीत कोणाला मतदान करायचे आणि कोणाला नाही याचे संभ्रम निर्माण झाले आहे मात्र अर्जुनी मोरगाव तालुक्यातील, सुकळी, खैरी, गोठांनगाव, प्रतापगड या गावामधे जेव्हापासून प्रचाराला सुरुवात झाली तेव्हापासून एकही पक्षाचे उमेदवार गावकऱ्यांना भेटी देण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत नाही मात्र त्याचे भाड्याचे माणसे माञ दिवसभर येत राहतात खोटे आश्वासन देतात आणि निघून जातात तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहून मतदान करायचे हे मोठी चिंतेची बाब अर्जुनी मोरगाव तालुक्यात निर्माण झाली आहे मात्र गोंदिया जिल्ह्यातील युवा काँग्रेस कार्यकर्ते व सा. कार्यकर्ते मा. दुर्गप्रसाद घरतकर यांनी जोपर्यंत या गावामधे स्वतः पक्षाचे उमेदवार भेट द्यायला येणार नाही लोकांच्या समस्या जाणून घेणार नाही तोपर्यंत अनेक युवा वर्ग मतदान करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या