टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ? What is term insurance?



आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आर्थिक सुरक्षिततेची गरज अधिक महत्त्वाची बनली आहे कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना आपल्याला आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करण्याची आवश्यकता भासते या संदर्भात टर्म इन्शुरन्स एक उपयुक्त साधन आहे. टर्म इन्शुरन्स म्हणजेच जीवन विमा जो एक विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो या लेखात टर्म इन्शुरन्सचे महत्त्व, फायदे, तोटे, आणि योग्य इन्शुरन्स ची निवड कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ?

टर्म इन्शुरन्स एक प्रकारचा जीवन विमा आहे जो एक निश्चित कालावधीसाठी (जसे की 10, 20 किंवा 30 वर्षे) घेतला जातो. या कालावधीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला निश्चित रक्कम दिली जाते. याला 'संपूर्ण विमा' किंवा 'संपूर्ण जीवन विमा' च्या तुलनेत एक महत्त्वाचा फरक आहे कारण टर्म इन्शुरन्समध्ये विमाधारकाच्या जीवनभराची सुरक्षा नाही फक्त तो ठरलेल्या कालावधीत सक्रिय असतो आणि तो ठरलेल्या कालावधी नुसार तुम्हाला भेटतो.

टर्म इन्शुरन्सचे फायदे पाहा.

1.किफायतशीर प्रीमियम : टर्म इन्शुरन्सचे प्रीमियम सामान्यत इतर प्रकारच्या विम्यांच्या तुलनेत कमी असतात त्यामुळे अधिक लोकांना ही योजना घेणे शक्य होते.

2. संपूर्ण कव्हरेज : टर्म इन्शुरन्स जीवनात अनपेक्षित घटनांमुळे आर्थिक संकटात असलेल्या कुटुंबांना संरक्षण देते कुटुंबाच्या नॉमिनीला विम्याच्या रकमेचा लाभ होतो ज्यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित राहते.

3. कर लाभ : भारतात टर्म इन्शुरन्स प्रीमियमवर कर सवलत मिळते त्यामूळे भारतीय आयकर कायद्यानुसार सेक्शन 80C अंतर्गत प्रीमियम भरण्यावर कर सवलत मिळते.

4. लवचिकता : टर्म इन्शुरन्स योजना निवडताना विमाधारक त्याच्या गरजेनुसार कालावधी रक्कम आणि प्रीमियम बदलू शकतो.

5.अतिरिक्त कव्हरेज : अनेक विमा कंपन्या टर्म इन्शुरन्ससह अॅड-ऑन कव्हरेज देतात जसे की गंभीर आजार कव्हरेज किंवा अपघात विम हा एक चांगलं घायदा टर्म इन्शुरन्स च आहे.

टर्म इन्शुरन्सचे तोटे

1. कव्हरेजची मर्यादा : टर्म इन्शुरन्समध्ये, विमाधारकाच्या जीवित असण्याच्या काळात काहीही लाभ मिळत नाही. या विम्याचा फायदा फक्त विमाधारकाच्या मृत्यूनंतरच मिळतो.

2.पुनर्नवीनीकरणाची आवश्यकता : कालावधी संपल्यानंतर, जर विमाधारकाने नव्याने टर्म इन्शुरन्स घेण्याचा निर्णय घेतला तर त्याला नवीन प्रीमियमचे मूल्यांकन केले जाईल जे त्याच्या वयामुळे अधिक असू शकते.

3. संपूर्ण विमा नसलेल्यांचा धोका : टर्म इन्शुरन्स चुकल्यास किंवा विसरल्यास विमाधारकाला काहीही आर्थिक संरक्षण मिळत नाही यामुळे अनेक लोकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.

टर्म इन्शुरन्सची निवड कशी करावी ?

1. गरजा ठरवा : टर्म इन्शुरन्स घेण्यापूर्वी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा आणि भविष्यातील खर्चाचे आकलन करणे महत्त्वाचे आहे. कुटुंबाची संरचना, कर्जाची रक्कम, आणि भविष्यातील उद्दिष्टे यांचा विचार करणे आवश्यक आहे.

2.कव्हरेजची रक्कम : विम्याची रक्कम निवडताना कुटुंबाच्या जीवनशैली दीर्घकालीन खर्च आणि कर्ज यांचा विचार करावा. सामान्यत विमाधारकाच्या वार्षिक उत्पन्नाचा 10 ते 15 पट रक्कम म्हणजे योग्य कव्हरेज असू शकते.

3. कालावधी निश्चित करा : टर्म इन्शुरन्सची कालावधी निवडताना तुमच्या दीर्घकालीन आर्थिक गरजांचा विचार करा अधिक काळासाठी कव्हरेज घेणे अधिक सुरक्षित ठरते.

4. कंपनीचे नाव आणि विश्वासार्हता : विमा कंपनीची विश्वासार्हता ग्राहक सेवा आणि क्लेम नोंदणीची प्रक्रिया महत्त्वाची आहे म्हणून विविध कंपन्यांचे तुलना करून सर्वोत्तम निवड करणे आवश्यक आहे.

5.अॅड-ऑन कव्हरेज: काही विमा कंपन्या अॅड-ऑन कव्हरेजची सुविधा देतात गंभीर आजार कव्हरेज किंवा अपघात विमा यांसारख्या अॅड-ऑनचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे.

टर्म इन्शुरन्स आणि जीवन योजनेचे महत्त्व

टर्म इन्शुरन्स म्हणजे फक्त एक विमा योजना नसून, ती आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे आजच्या काळात विविध प्रकारच्या आर्थिक गुंतवणूक योजनेच्या बाबतीत टर्म इन्शुरन्सचा समावेश करणे आवश्यक आहे आर्थिक सुरक्षा आणि आर्थिक शांती यासाठी टर्म इन्शुरन्स महत्वाची भूमिका बजावते त्यासाठी तुम्हीपण टर्म इन्शुरन्स काढून घ्या .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या