PM Kisaan 18 Va Hapta : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वजण आज वाट पाहत असलेल्या गोष्टीची म्हणजेच पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता (PM Kisan Namo Shetkari Yojana 4000 ) हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऑनलाईन पद्धतीने जमा होत आहे त्यासोबतच नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचे सुद्धा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास ही सुरुवात झालेली आहे.
आज वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी येथे याविषयीचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ताचे 2000 आणि नमो शेतकरी किसान योजनेचे 2000 हे जमा करण्यात आलेले आहेत.
मित्रांनो जर अजूनही आपल्या खात्यावरती पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता जर आला नसेल तर आपण एकदा पीएम किसान pmkisan या वेबसाईट वरती जाऊन आपलं अकाउंटचं स्टेटस हे चेक करून घ्यायचंय सर्व जर ओके असेल स्टेटस ओके असेल आधार लिंक असेल ई केवायसी जर झालेली असेल तर आपल्या खात्यावरती आज संध्याकाळ पर्यंत की उद्यापर्यंत नंतर आपल्या खात्यावरती पैसे हे जमा होणार आहे.
नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा
त्यासोबतच आपण नमो शेतकरी जी योजना आहे तिचे जर 2000 आपल्या खात्यावरती आले नसतील तर त्याचं स्टेटस चेक करुण पाहा कारण नमो शेतकरी चें 2000 रूपये सुद्धा जमा केलें गेले आहेत ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले असतील त्यांचे अभिनंदन हा पैसा आपल्या नक्कीच उपयोगी येईल शेतीचे सध्या आता काढणीचे पिकं काढणीचे काम चालू आहे त्याकरता सणासुधीचे दिवस आहेत त्याकरता आपल्याला पैसा हा उपयोगी पडेल.
0 टिप्पण्या