
डिजिटल गावकरी
नमस्कार मंडळी, महाराष्ट्रातील बँक कर्मचाऱ्यांनी 16 नोव्हेंबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्यानं बँक कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटत नसल्याचं यूनियनचं म्हणणं आहे. यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने (UFBU) संपाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. यूएफबीयू बँक यूनियनची संघटना आहे. लाडकी बहीण योजनेच्या काही लाभर्थ्यांकडून बँक कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे यूनियनने आंदोलनाची भूमिका घेणार आहे असे सांगितले आहे .
बँक यूनियनने आंदोलनाचा निर्णय का घेतला वाचा ?
यूएफबीयू (UFBU) चे स्टेट संयोजक देवीदास तुळजापूरकर यांनी म्हटलंय की, लाडकी बहीण योजनेबाबत बँकांमध्ये खूप मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारकडून योजनेबाबत व्यवस्थित संवाद केला जात नाही. त्यामुळे बँकेतील कर्मचारी गोंधळलेले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागात योजनेचे लाभार्थी आणि स्थानिक नेत्यांकडून बँक कर्मचाऱ्यांना शिविगाळ आणि मारहाण केली जात आहे त्याजबरोबर आम्हावर प्रेशर टाकत असल्याने यासाठी आम्ही एक दिवसीय आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
0 टिप्पण्या