फोर-प्ले सेक्स म्हणजे काय ? फोर प्ले सेक्स करायला पाहिजे का?

 


फोर प्ले सेक्स करणे का गरजेचा असतो फोर प्ले सेक्स विषयी संपूर्ण माहिती.

हे फोर प्ले म्हणजे नक्की काय असतं ते तरी सांगाल आम्ही जे करतो ते जमतच नाहीये पुढे काय होतच नाहीये असे बोलणारे कपल्स इतके येऊन गेले आता की त्यांच्याबद्दल सांगणंच कठीण झालंय त्यामुळे फोर प्ले आणि आफ्टर प्ले स्त्रियांचा आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत या गोष्टींबद्दल संवाद साधणं मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा ब्लॉग सुरू केलाय मी डॉक्टर नीलिमा देशपांडे मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्सुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे आज तुम्ही फोर प्ले ला फार महत्त्व न देता तो पटकन उरकून घेत असाल तर मग हा ब्लॉग नक्की वाचा.


हॅलो हा विषय खूप महत्त्वाचा तितकाच इंटरेस्टिंग आणि तितकाच दुर्लक्षितही आहे  फोर प्ले म्हणजे नेमकं काय हेच अनेक कपल्सना माहिती नसतं किंवा माहिती असलं तरी ते त्याकडे चक्क दुर्लक्ष करतात असं तुमच्याकडे येणाऱ्या केसेस मध्ये दिसतं तुम्हाला अब्सोल्युटली फोर प्ले म्हणजे नक्की काय आणि त्याच्यावरती किती वेळ द्यायचा आणि कशासाठी हेच बरेच कपल्सना माहिती नसतं त्यातून फोर प्ले असं कुठलं तरी पोर्न फिल्म बघून करायचं असतं किंवा कुठलं इरोटिका मटेरियल वाचून करायचं असतं अशी काहीतरी गैरसमजूत असते मेन ही समजूतच नाहीये की आपल्या समोर जोडीदार आहे ती पुरुष असो किंवा महिला त्याला काय आवडतं किंवा तो टर्न ऑन किंवा ती टर्न ऑन कशामुळे होते हेच जेव्हा शिकायची तयारी नसते हे ओपननेस जेव्हा नसतं क्युरियोसिटी नसते तेव्हा हे प्रॉब्लेम्स येतात त्यामध्ये कसं बसं उरकायचं आणि त्या अंधारात काहीतरी धडपड करायची आणि सेक्स इंटरकोर्स कम्प्लीट करायचा आणि मग झालं बहुतेक वेळा ह्याचा प्रेशर अशामुळे पण असते की फॅमिली मागे लागली असते आता चांगली बातमी कधी मिळेल आम्हाला गुड न्यूज कधी देताय मग भात उरकून टाका आणि मेन इशू असा आहे की जेव्हा सेक्स हे वर्क होतं तुम्ही त्याला प्लेफुली घेत नाही किंवा एन्जॉय करू शकत नाही तेव्हा हळूहळू त्याची मजा निघून जाते करेक्ट करेक्ट म्हणजे मला आठवते की लोकसत्ताच्या आर्टिकल्स वेळेला मी एका डॉक्टरांशी बोललेलो सो त्यांनी मला एक केस स्टडी सांगितलेली की लग्नानंतर एक मुलगी अवघ्या महिन्याभरातच माहेरी परतली हा थोडासा रूरल एरियातला आपण म्हणतोय गोष्ट सो तिचं असं म्हणणं होतं की नवरा काहीही करतो आणि तिची आई पण म्हणत होती की आमची मुलगी अगदी शिस्तीत वाढलेली आहे सातच्या आत घरी येणारी आहे थोडक्यात पोरप्ले आणि सेक्स खूप लांब राहिलं आधी स्वतःच्या शरीराबद्दल तिच्या अवयवांबद्दल माहिती असणं खूप गरजेचे आहे हा फक्त आपल्या देशात नाही तर जगाभरामध्ये हा एक प्रॉब्लेम असा आहे की मुला-मुलींना आपण कसं वाढवतो त्याच्यामध्ये खूप फरक असतो मुलांना बहुतेक वेळेला त्यांच्या वडिलांकडनं किंवा इतर मुलांकडनं खूप परस्पर बॉडी आणि जेनेटल्स आणि सेक्सच्या बद्दल एज्युकेशन मिळत असतं मुलांचं पॉनशी एक एक्सपोजर किंवा एररोटिक असे लिटरेचरशी एक्सपोजर आता स्मार्टफोन्स मुळे व्हिडिओज एक्सपोजर खूप लवकर होत असतं त्याच्या कंपॅरिझन मध्ये मुलींना खूप शिस्तीत वाढवलं जातं माझ्या म्हणजे मी लहान असताना सुद्धा आई म्हणायची लोकांच्या घरी दिवे लागले की थांबायचं नाही घरी यायचं कुठे जात असली तर चार वेळा मुलीला सांगणार कोणाबरोबर चालली आहे कुठे चालली आहे कधी चालली आहे अजूनही आई विचार नाही माहिती असायला पाहिजे ना जग काही ठीक नाहीये मग अंधार झाला किती उशिरा येणार आहे कुलूप ठेवायचं का नाही दारू कुठे ठेवायचं का नाही तिकडे किल्ली आहे का हजार प्रश्न मुलींना विचारतात मुलगा म्हणाला मी कुठे जातोय तर ठीक आहे म्हणजे आज रात्रीच परत येणार आहे ना वगैरे असे प्रश्न विचारतात मग बॉडीज बद्दल म्हणलं तर मुलींना मुलींचे जेनेटल्स हिडन असतात ते दिसत नाहीत त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल एज्युकेशन मिळतच नाही लहान मुलींमध्ये युरिन इन्फेक्शन होणं ह्याचं प्रमाण उन्हाळ्यामध्ये किंवा जेव्हा ती शाळेला जायला लागते पिरियड सुरू होतात तेव्हा का वाढलेलं असतं की त्या मुलीला तिच्या आईकडनं किंवा मोठ्या बहिणीकडनं किंवा इतर महिलांकडनं फॅमिलीच्या काही एज्युकेशनच मिळत नाही की स्वच्छता त्या जागेची स्वच्छता कशी राखायची का राखायची त्या भागाच्या अवयवांचे नाव काय आहेत आपण नक्की वजायना म्हणजे कुठे असतो त्याला क्लीन कसं करायचं लघवी केल्यानंतर ती जागा स्वच्छ कशी ठेवायची मग जशी ती मुलगी मोठी होते त्या पिरियड्स येणं म्हणजे त्याचा अर्थ काय असतो त्याचा आणि प्रेग्नेंसीची किंवा सेक्स काय रिलेशनशिप असतं आणि हो असतात म्हणजे मुलींना जास्ती काळजी घ्यावी लागते.


म्हणून अनवॉन्टेड प्रेग्नेंसीचा जो भार असतो तो मुलींवरती जास्त पडतो त्या बाईच्या शरीरावरती दुष्परिणाम होतात अनवॉन्टेड प्रेग्नेंसी आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स झेलण्यात आणि पुरुषांना किंवा मुलाला फारस काय त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत पण आजच्या काळामध्ये अनवॉन्टेड प्रेग्नेंसी सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स इमोशनल ट्रॉमा ह्या गोष्टी सत्य आहेत ना मग प्रत्येक मुलीला किंवा मुलाला त्याच्या शरीराच्या अवयवांबद्दल त्याचे बरोबर नाव माहिती असली पाहिजेत त्याची काळजी  कशी घ्यायची त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असले ते कसे डॉक्टरांना रिपोर्ट करायचे कसे सांगायचे कधी तपासून घ्यायचं प्लस आपली प्युबर्टीची जी जर्नी असते त्याच्या त्याचं जे पर्पज असतं अराउजलचं सेक्सुअल सॅटिस्फेक्शनचं हॅप्पीनेस प्लेजरच त्याचं आणि कुठल्याही कपल रिलेशनशिप मध्ये त्याचा रोल काय असतो ह्याच्याबद्दल जोपर्यंत संवाद घडत नाही जोपर्यंत कपल एकमेकांशी आणि सपोज कोणी एल्डर्स असले आई-वडील किंवा भाऊ बहिण पेरेंट्स असले ते जर जोपर्यंत त्यांच्या मुलांशी ओपनली ह्या गोष्टी डिस्कस करू शकत नाही तोपर्यंत त्या मुलांना किंवा मुलींना सिक्युअर नाही वाटणार ह्या गोष्टी डिस्कस करायला आणि मग असे प्रॉब्लेम्स उद्भवतात की मुलगी लग्नापर्यंत पोहोचते आणि तिने आयुष्यभर फक्त हेच ऐकलेलं असते की तुझी ओढणी ठीक नाहीये तुझा ड्रेसचा ब्लाऊज कसा आहे गळा फार लो आहे भाया लांब का नाहीयेत खांदे का दाखवते स्लीवलेस का घालते तुझं स्कर्ट फार शॉर्ट आहे लांब कर अशे हाय हिल्स घालायची गरज आहे का चालताना कसतरी दिसतं हे कव्हर केलं का ते कव्हर केलं का आणि मग लग्न झालं की अचानक एक्सपेक्ट करते की ह्या अनोळखी माणसासमोर तिने सगळे कपडे काढून पूर्ण शरीराला त्याला सरेंडर करावं तर हे एक्सपेक्टेशनच चुकीचं आहे त्यामुळे ती आई चुकीची नाहीये म्हणायला की आमची मुलगी शिस्तीत वाढली आहे पण प्रॉब्लेम असा आहे की त्या शिस्ती बरोबर जे सेक्स एज्युकेशन गरजेचं आहे की बाबा लग्न म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल तुम्ही नवरा बायकोने डिस्कस केलं पाहिजे की तुमच्या आवडीने काय आहे तुमच्यामध्ये सेक्सुअल अट्रॅक्शन आहे का नाही हे कसं ठरवायचं ह्याचं डिस्कशन कधी होतच नाही.


म्हणून आपल्या सेक्स एज्युकेशन मध्ये आपल्या शाळेंमध्ये कॉलेजमध्ये सेक्स एज्युकेशन म्हणजे अनाटॉमी शिकवणं हं करेक्ट पण हे जे इमोशनल उलाढाळ असते प्युबर्टीची किंवा एका नवीन रिलेशनशिप मध्ये आपण एक एपिसोड केलेला आहे 16 व्या वर्ष का धोक्याचं असतं म्हणून कारण की लवचे जे केमिकल्स असतात ते तुम्हाला सरळ विचार करू देत नाहीत पण प्रत्येक गोष्ट जेव्हा लव मध्ये घडलेली असते ती नेहमीच लॉंग टर्म रिलेशन साठी बरोबर असते का हे आपण त्या मुला-मुलींना ओळखायला शिकवलेलं नसतं मग हीच मुलगी सपोज लग्नाच्या वेळेला गेली असती आणि हे सगळं डिस्कशन तिच्याबरोबर झालेलं असतं आणि सपोज नवरा बायकोंनी सुद्धा एकमेकांच्या बरोबर होणाऱ्या नवऱ्या बायकोनी एकमेकांशी बोललं असतं बाबा सेक्स म्हणजे असं असतं मॅरेज म्हणजे हे असतं हे अराउजल म्हणजे असं असतं हे जर ओपननेस आलं असतं तर एक काही काळ म्हणजे दोन चार महिने ते शिकायला तरी वेळ देता आला असता एका डॉक्टरच्या मदतीने किंवा एका नर्सच्या किंवा एक फॅसिलिटेटरच्या मदतीने सुद्धा हे शक्य आहे असं नाही आहे की कोणीतरी खूप कंजर्वेटिव्ह बॅकग्राऊंड मध्ये वाढले म्हणून त्यांनी काहीच कधी शिकता शिकता कामा नये किंवा त्यांना काहीच जमणार नाही किंवा आता ही मुलगी गॉन केस आहे हिचं लग्न करणं कठीण आहे असं तर नाहीये ना हं शिकायला काय आज तरी काही एक्सक्यूज नाहीये इंटरनेट आहे फोन्स आहेत स्मार्टफोन आहे मटेरियल आहे प्रिंटेड मटेरियल आहे काही शॉर्टेज नाहीये नॉलेज आणि इन्फॉर्मेशनचं फक्त एक नॉन जजमेंटल एन्व्हायरमेंट हवय आणि एक चांगला फॅसिलिटेटर हवंय ते कोणीही ही गोष्ट सहजपणे शिकू शकतं आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात करू शकतं इंक्लूड करू शकतं आणि एक हेल्थी सेक्सुअल लाईफ एन्जॉय करणं हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे हे वर्ल्ड असोसिएशन ऑफ सेक्सुअल सेक्सुअल हेल्थनी हे काही राईट्स डिक्लेअर केलेले आहेत आपले सेक्सुअल राईट्स आहेत हे ऍक्च्युली पेरेंट्सना पण शिकवायला पाहिजे की तुमच्या मुलांचे राईट्स आहेत राईट राईट तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की ते मोकळं वातावरण पाहिजे आणि लग्न आधी किमान काही महिने याचं ट्रेनिंग एक्सपर्ट्स कडनं घेणंच खूप सहज शक्य आहे.


बाजारामध्ये अशी अनेक पुस्तक आहेत मराठीतही अनेक आहेत डॉक्टर विठ्ठल प्रभूंची आहेत ही सगळी घेऊन वाचली पाहिजेत आणि त्यात त्याबद्दल विनाकारण बाऊ किंवा संकोच बाळगला नाही पाहिजे सो कमिंग बॅक टू फोर प्ले यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो एक गैरसमज आहे फोर प्ले बद्दल की ती फक्त सेक्सुअलच असली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये फक्त अराउजलच असलं पाहिजे किंवा ते जस्ट इंटरकोर्सच्या आधी करतात म्हणून त्याला फोर प्ले असं म्हणतात हं अशा डेफिनेशनचा एक इशू होतो की बाकी आयुष्यामध्ये तुम्ही काही केला तुम्ही एकमेकांशी कसेही वागलात तरी चालतंय फक्त बेडरूम मध्ये गेलात ते आधी ते 10 मिनिटं तुम्हाला असं वागलं तर तुमचा पार्टनर सेक्स साठी तयार होईल आणि ऍक्च्युली ही समजूत आहे ज्याच्यामुळे आज जे माझ्याकडे कपल्स येतात त्यांचे जे सेक्सुअल लाइफ अनफुल आहेत किंवा बेडरूम मध्ये जे त्यांचे एक्सपिरियन्सेस आहेत ऑप्टिमल का नाहीयेत ही गैरसमज आहे तुम्ही दहा मिनिटांमध्ये तुमच्या इतर आयुष्यातल्या गैरवर्तनाला करेक्ट करू शकत नाही तर असं म्हणणं पण महत्त्वाचं आहे की तुमचं जे रिलेशनशिप आहे हे तुमच्या सेक्सुअल कम्युनिकेशनचा फाउंडेशन आहे तुम्ही जर एकमेकांशी समोरासमोर कम्युनिकेट करू शकला नाहीत चांगलं बोलू शकला नाहीत एकमेकांना अप्रिशिएट करू शकला नाहीत प्रेम करू शकला नाहीत चांगले शब्द वापरू शकला नाहीत तर तुमचं सेक्सुअल इंटरॅक्शन किंवा कम्युनिकेशन तितकंच प्रेमळ तितकंच लविंग तिथंच तितकंच कंपॅशनेट किंवा एक्साइटिंग इन्विग्रेटिंग असेल हे आपण सांगू शकत नाही त्याची शक्यता खूप कमी होते म्हणजे काय की तुमच्या पार्टनरला तो कोणीही असेल तुमच्या सेक्सुअल ऍडव्हान्सेस साठी कंडूसिव होण्यासाठी म्हणजे एक्सेप्टिंग असण्यासाठी तुम्हाला जी तयारी करायला लागते ते तुमच्या रिलेशनशिप फाउंडेशन आहे ती तुमची लव लैंग्वेज आहे म्हणजे आपली बायको सपोज दिवसभर काम करून मग घरी येऊन आपल्यासाठी जेवण बनवत असली तर तिच्यासाठी अप्रिसिएशन हे खूप महत्त्वाचं आहे की हो मी तुला मदत करू का किंवा नवरा खूप कॉम्प्लिकेटेड कुठल्यातरी प्रोजेक्ट मध्ये अडकलेला आहे आणि तो सपोज अनिव्हर्सरीची डेट विसरला किंवा कुठलातरी गिफ्ट विसरला ते करून सुद्धा नंतर आठवणीने काही आणलं तर त्याला खाली पाडण्यापेक्षा धुत्तकार आणण्यापेक्षा त्याचं अप्रिशिएट करणं की हो मला माहिती आहे की तुझं दिवस खूप कॉम्प्लिकेटेड होता तरीसुद्धा तू हे माझ्यासाठी केलस मी खूप अप्रिशिएट करते किंवा बायकोला कॉम्प्लिमेंट्स देणं तिच्या दिसण्यावरनं किंवा तिच्या स्किल्स वरन किंवा एबिलिटीज वरन आणि स्पेसिफिकली ते कॉम्प्लिमेंट देणं हे महत्त्वाचं आहे.


आपण नॉन सेक्सुअल टच जे म्हणतो बेडरूमच्या बाहेरचा एकमेकांचे हात धरणं खांद्यावरती हात ठेवणं बोलताना शेजारी बसणं एकमेकांची जी नजर असते कोणीतरी चांगली न्यूज दिली सपोज पार्टनरली तर ते इमिजेटली डिसगस्ट न होणं किंवा कंटेम्प्ट न होणं किंवा खाली न पाडणं त्याला अप्रिशिएट करणं या सगळ्या गोष्टींचा त्या रिलेशनशिप फाउंडेशन वरती जेव्हा मग तुम्ही सेक्सुअल एडवांन्स करता तेव्हा तुम्हाला पॉसिबिलिटी त्याच्याकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायची शक्यता वाढलेली असते मग जेव्हा आपण ऍक्च्युअल फोर प्लेच्या ॲक्शन्स मध्ये जातो त्याच्यामध्ये होल बॉडी टचिंग किसिंग कडलिंग मग नॉन जेनिटल स्ट्रोकिंग म्हणजे शोल्डर्स आर्म्स मग आपण जे म्हणतो इरोजिनस झोन्स असतात बाईच्या किंवा पुरुषाच्या शरीरावरती आणि हे शिकायला वेळ लागतो आणि प्रत्येक पर्सनला स्वतःची बॉडी काय आहे हे समजून घेणं आणि ते कम्युनिकेट करणं की बाबा तू इथे मला ब्रेस्टला असा हात लावलास त्याच्यामुळे ते दुखतंय ते असं असं हात लावलास तर ते कमी दुखेल आणि मला प्लेजर जास्त वाटेल पण जोपर्यंत तिला माहिती नाहीये की ते कसं असतं तोपर्यंत ती कम्युनिकेट नाही करू शकत रिसेंटलीच माझ्याकडे एक कपल आलेलं आहे की त्याला काय जमतच नाही तो नुसतं जसं आटा गोंदल्यासारखं करतो ते इतकं दुखतं की मला काय ते सहनच होत नाही मी ते हात ढकलून टाकते आणि मला ते एकदा दुखायला लागलं की असह्य होतं मग मला प्लेजर काही सुचत नाही पण मग विचारलं मग तू शिकवलंस का त्याला की तुला कसं आवडतं नाही त्याला नको का कळायला नाही त्याचं शरीर नाहीये तुझं शरीर आहे तुझे इरोजिनस झोन्स ब्रेस्ट आहेत पण तुझे ब्रेस्ट कसे टच करायचे हे प्रत्येक बाईचं तर नाहीये ना एक्सपिरियन्स मे बी त्याची आधीची गर्लफ्रेंड होती तिला खूप जास्त रफ ट्रीटमेंट आवडत असेल पण तुझे जर ब्रेस्ट सेन्सिटिव्ह असले स्पेशली बायकांचे ब्रेस्ट तर सायकल मध्ये पण चेंज होतात पिरियड्स इमिजेटली संपल्यानंतर जे ब्रेस्टची टेक्सचर किंवा सेन्सिटीव्ही असते ती पिरियडच्या आधी पेक्षा वेगळी असते बहुतेक बायकांना पिरियडच्या आधी ब्रेस्ट खूप टच केले तर ते अनकंफर्टेबल असतात पेनफुल असतात तर ही जी सेन्सिटिव्हिटी असते ही स्वतःला पण तिला ओळखायला पाहिजे आणि तिला ते तसं कम्युनिकेट करणं गरजेचं असतं किंवा लगेचच जेटल टचिंग सुरू करतात बहुतेक हे कंप्लेंट बायकांची असते की हे ब्रेस्ट आणि जेनेटच्या पलीकडे त्याला माझा दुसरा अंग दिसतच नाही आणि ऍक्च्युली बायकांचे इरोजिनस झोन्स कुठे असतात तर तुम्हाला नुसती एक बॉलिवूड फिल्म बघितलं तरी कळतं तिचे केस आहेत तिचे डोळे आहेत तिचे कान आहे तिचे मान आहे कमरेचा बाजूचा भाग आहे बेंबीच्या आजूबाजूची जागा आहे थाईज आहेत लेग्स आहेत फीट आहेत पायाची बोट आहेत हाताची बोट आहेत साधा एकमेकांचे हात केरस केल्याने फोर प्ले येऊ शकतो अराउजल होऊ शकतं फुल्ली ड्रेस सो जरुरी नाहीये की फोर प्ले ह्या डेफिनेशन मध्ये अनड्रेसिंग अनड्रेसिंगची जी पद्धत आहे ती पण फोर प्ले असू शकते तसेच मेनची पण काही इरोजिनस झोन्स आहेत फक्त बाईलाच फोर प्ले ची गरज असते असं नाही पुरुषांना पण असते.


तर ते पुरुषांचे इरोजिनस झोन्स ओळखणं त्याच्यावरती कसं आपण टच करतो कुठले जेस्चर्स यूज करतो आपण काही प्रॉप्स यूज करू शकतो हे सगळ्या गोष्टी फोर प्ले मध्ये येतात आणि ऍक्च्युली एस्थपेरेलचं म्हणणं आहे की एका ऑर्गॅझम आणि दुसऱ्या ऑर्गॅझम मध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण फोरफ्ले म्हणू शकतो आणि ते खरंच डेफिनेशन करेक्ट आहे वाह येस मेटिंग इन कॅप्टिव्हिटी मी वाचले पेरल सो खूपच चांगलं पुस्तक आहे सो हे नक्की लिसनर्सनी वाचावं सो मॅडम फोर प्ले इतकीच महत्त्वाची इंटिमसी पण असते का तुम्ही आता मेंशन केलं फोर प्लेच्या ह्याच्यात पण आम्हाला थोडं सांगता की इंटिमसी म्हणजे नेमकं काय हां हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे रिसेंटलीच एक कपल माझ्याकडे आलेले ते म्हणतात हा आम्हाला सेक्स जमतं सेक्सचा काही प्रॉब्लेम नाहीये पण वी डोन्ट लाइक ईच अदर म्हटलं म्हणजे काय नाही म्हणजे काय ते तो जे करतो ते आवडत नाही म्हणून आम्ही ते करायचं सोडून दिलं म्हटलं बरं बाकीचं तुम्ही काय करता माय तुमच्या एरवीच्या लाईफ मध्ये काही नाही आम्ही बाहेर रेस्टॉरंट मध्ये जातो आम्ही फिरायला जातो आम्ही हॉलिडेज करतो म्हटलं बरं मग तुम्ही एकमेकांशी बोलायला वेळ देता का नाही म्हटलं म्हणजे काय नाही म्हणजे आम्ही एकमेकांच्या शेजारी बसतो पण आम्ही फोनवर असतो हं आजकालच्या स्मार्टफोनच्या युजमुळे किंवा टीव्ही आम्ही शेजारी बसून टीव्ही बघतो म्हटलं बरं आणि मग काय होतं मग तुम्ही ते टीव्ही मध्ये जे बघितलं ते डिस्कस करता का नाही मग काय करता नाही मग आम्ही बेडरूम मध्ये जातो आणि झोपतो तर ही जी कॉन्सेप्ट आहे इंटिमसीची ही समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की इंटिमेसी ही फक्त तुम्ही कपडे काढल्यानंतर जी सुरुवात होते ती नाहीये इंटिमसी म्हणजे तुम्ही एकमेकांना किती डेप्थ मध्ये ओळखता आणि किती त्या डेप्थ मुळे तुम्ही टर्न ऑन होत असता एकमेकांमुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे डेफिनेशन आहेत आणि मी त्या कॉम्प्लेक्स डेफिनेशन मध्ये जात नाही पण तुम्ही ओळखू शकता की इमोशनल इंटिमेसी एक आहे की तुम्ही तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत तुमच्या आयुष्याबद्दलचे जे प्लॅन्स आहेत त्याच्यामध्ये भीती आहेत काही अँटीसिपेशन आहे एक्साइटमेंट आहे तुम्ही किती फ्रीली आणि ओपनली शेअर करू शकता विदाऊट जजमेंट ही एक इमोशनल इंटिमेसी आहे इंटेलेक्चुअल इंटिमेसी अशी आहे म्हणजे एकमेकांच्या अचीवमेंट बद्दल अकॅडेमिक किंवा नॉन अकॅडेमिक तुमची जी एबिलिटी आहे कुठली गोष्ट अनालाईज करायची सपोज तुम्ही कुठलीतरी न्यूज ऐकली तर तुम्ही कशी ती अनालाईज करता कशी इंटरप्रेट करता तुमचं जे वर्ल्ड व्यू आहे ते कसं आहे त्याच्यामध्ये ग्रोथ आहे का नाही आहे का तुम्ही तेच तेच गोष्टी परत परत रखडून रखडून रखडून डिस्कस करता ही इंटेलेक्चुअल इंटिमेसीचा एक भाग झाला मग फिजिकल इंटिमेसी म्हणजे आउटसाइड द बेडरूम तुम्ही एकमेकांना फिजिकल टचनी किंवा कॉन्टॅक्टने किती एकमेकांना शुअर करता किती तुमचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन किती स्ट्रॉंग आहे तुम्ही एकमेकांशी जेव्हा तुमचे जेव्हा डोळे भेटतात तेव्हा तुमचे डोळे बोलके असतात का आणि त्याच्यामधनं तुम्ही एकमेकांशी काय कम्युनिकेट करता तुमच्या बॉडी लँग्वेजनी मग आपण जेव्हा सपोज काही गोष्टी बरोबर करत असलो ऍक्टिव्हिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल ट्रेकिंगला गेलोत तर ही फिजिकल ऍक्टिव्हिटी रिलेटेड इंटिमेसी असते की हा आपण ट्रेकिंगला चाललोय त्याच्यामध्ये आपण जेव्हा शेअर करतो आपला एक्सपिरियन्स दुसऱ्या पर्सन बरोबर जी सेंचुअलिटी असते आपल्या बॉडीची सेन्सेशन्स असतात त्या नेचर मधल्या एक्सपिरियन्सची किंवा सपोज तुमच्याकडे पेट आहे त्या पेटला लुक आफ्टर करण्यामध्ये जे तुमचं शेअर्ड एक्सपिरियन्स आहे ती पण एक इंटिमेसी असते तर इंटिमेसीचे असे खूप सगळे लेव्हल्स असतात ते ओळखून घेणं कपल्सना खूप गरजेचं असतं बहुतेक कपल्स ज्यांचं खूप छान रिलेशनशिप असतं ते ह्या गोष्टीशी रेसोनेट होतील कारण की ते बऱ्याच गोष्टींमध्ये कॉमन आहे डिफरन्सेस शोधत असतात आणि जेव्हा डिफरन्सेस असतात तेव्हा त्या गोष्टीला ते क्यूरियोसिटीने अप्रोच करतात नक्की भीतीने किंवा त्याचे विचार माझ्यासारखे नाही म्हणजे त्याचा माझ्यावरती प्रेम नाही असं इंटरप्रेट करत नाही ते ऑटोमॅटिकली सपोज दुसऱ्या कोणाचा विचार वेगळा असला कुठल्या टॉपिक वरती तर ते क्यूरियोसिटीने त्या टॉपिकला एक्सप्लोर करतात आणि मग डेप्थ मध्ये जाऊन ऐकून घेतात दुसऱ्या पर्सनची कारण की एज अ ह्युमन बीइंग आपली सगळ्यात पहिली गरज असते की आपल्याला कोणीतरी एक्सेप्ट करतय आणि आपलं ऐकून घ्यायची त्याची तयारी आहे त्याच्यानंतरच आपण ऐकायला तयार होतो तर ज्या कपल्स मध्ये हे फाउंडेशन असतं ते मग बाकीचे लेवल्स ऑफ इंटिमेसी इझिली कल्टिवेट करू शकतात आणि ऐकणं हे फक्त कानाने आपण ऐकत नाही आपल्या पूर्ण शरीराने ऐकत असतो आपण डोळ्याने ऐकत असतो टेस्टने ऐकत असतो सेन्सेशननी स्किननी बॉडी लैंग्वेजनी या सगळ्या गोष्टीने आपल्या सेन्सेसनी आपण ऐकत असतो वाह म्हणजे तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की तुम्ही बेडरूम बाहेर किती गोष्टी सोबत करताय यावरून तुमचं सेक्स लाईफ ठरतं का आणि थोडक्यात इंटिमसी किंवा फोर प्ले यांचा केवळ लैंगिक चौकटीतून विचार नाही केला पाहिजे म्हणजे सेक्सुअल इंटिमेसी जरी हा पार्ट असला इंटिमेसीचा तरी फक्त सेक्सुअल म्हणजेच इंटिमेसी असं नाहीये आणि एक गोष्ट म्हणजे सेक्सुअल इंटिमेसी जेव्हा आपण बोलतो ते फक्त सेक्स करणं असं नसतं इंटरकोर्स इज नॉट सेक्सुअल इंटिमेसी त्या क्लोज गोष्ट त्या क्लोज फिजिकल स्पेसमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या गोष्टीला डेप्थ मध्ये किती एक्सप्रेस करू शकता ही तुमची इंटिमेसी डिसाइड करते म्हणजे तुम्ही किती फ्री आहात तुमच्या पार्टनरला सांगायला की हे तू केलस तर इथे दुखतं असं नको करू असं कर किंवा हे केलस हे मला खूप आवडलं हे प्लीज जास्त कर किंवा हे जे तू करतोयस तू फास्ट करतोयस हे प्लीज स्लो कर किंवा जास्त जोरात कर किंवा कमी कर हे जे कम्युनिकेशन असतं किंवा त्या स्पेस मध्ये जोक करणं प्लेफुल होणं इरोटिक गोष्टी बोलणं बोलता येणं आपले फॅन्टसी शेअर करता येणं या सगळ्या गोष्टी त्या सेक्सुअल इंटिमेसीच्या स्पेस मध्ये होत असतात पण बाकीची इंटिमेसी नसली तर ही इंटिमेसी कल्टिवेट करणं खूप कठीण जातं ओके सो मॅडम पुढे जाऊया थोडसं की एक वेळ लोक आता फोर प्ले करतात किंवा त्यांना थोडंफार तरी माहिती असतं पण आफ्टर प्ले ही कॉन्सेप्टच अनेकांना माहिती नसते प्लीज सांगता आफ्टर प्ले विषयी आफ्टर प्ले हा कॉन्सेप्ट ऍक्च्युली आय वुड से की खूप फिमेल कॉन्सेप्ट आहे बायकांनी डिझाईन केलेलं आहे कारण काय बहुतेक बायका सांगतात की सेक्स झाल्यानंतर त्यांना जवळ घेतलेलं आवडतं करेस्ट केलेलं आवडतं थोड्याश्या गप्पा मारलेलं आवडतं आणि मग झोपायला आवडतं आणि बहुतेक पुरुष काय म्हणतात की मी ते केल्यानंतर इतका दमलेलो असतो की मला फक्त झोपायचंच असतं मला दुसरा काही विचार नसतो एक गोष्ट अशी असते की तुम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी कशी कंप्लीट करताय ह्याच्यावरती डिसाइड होतं की पुढच्या ऍक्टिव्हिटीचा टोन काय असणार आहे त्यामुळे थोडसं एफर्ट घेतला तर करंट जी सेक्सुअल ऍक्टिव्हिटी आहे त्याचं जे कंक्लूजन आहे ते आपल्याला कसं पाहिजे हाऊ डू यू वांट युअर पार्टनर टू फील एट द एंड ऑफ दिस तुम्हाला तुमचा जो प्रियकर आहे त्याने कसं फील करायला पाहिजे ही ऍक्टिव्हिटी संपल्यानंतर हे तुम्ही आधी डिसाइड करून तशी ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे फक्त स्वतःच सॅटिस्फेक्शन झाल्यानंतर मी झोपणार आणि मला पुढे काय कळायचं नाही पुढचं पुढे बघू असं म्हणणं पुरत नाही जी गोष्ट घडते इंटरकोर्स झाल्यानंतर इजाक्युलेशन झाल्यानंतर त्या लेडीज ऑर्गॅजम झाल्यानंतर जे काही गोष्टी घडतात जे तुम्ही बोलता जे तुम्ही एकमेकांना अप्रिशिएट करता करेस्ट करता फोंडल करता कडल करता झोपता त्याच्यावरनं डिसाइड होतं की पुढच्या रिक्वेस्टच्या वेळेला पुढच्या इंटिमेट अकरन्सच्या वेळेला तुमचा पार्टनर किती हो म्हणणार आहे त्या ऍक्टिव्हिटीला किती ओपन असणार आहे नवीन काहीतरी एक्सप्लोर करायला किंवा एक्सपेरिमेंट करायला कारण की पुढची जी गोष्ट आहे ती खूप महत्वाची आहे की तुम्ही नेहमीच सेक्स एकाच पद्धतीने केलं की ते बोरिंग होत जातं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या