खुशखबर! लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार बोनस; थेट खात्यात जमा होतील 5500 | Ladki Bahin Yojna Diwali Bonas.



Digital Gaavkari

Ladki Bahin Yojna Diwali Bonas : दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून सांगण्यात आलंय की, दिवाळीला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार याशिवाय काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी एक खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारने म्हटलंय की, दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3000 रुपयांचं बोनस दिलं जाईल. ही रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे वगळून दिली जाईल. काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाईल. याप्रकारे काही महिलांना एकूण 5500 (3000+2500) रुपयांचा लाभ मिळणार आहे. दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे यासाठी या अटी पूर्ण कराव्या लागतील पाहा .

काय आहेत अटी पाहा.

महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.

त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.

त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.

ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.

वरील अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळेल. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या