![]() |
Post office FD Scheme |
नमस्कार मंडळी, पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी नवनवीन योजना आणत असते. पोस्ट ऑफिसची अशीच एक फायद्याची योजना आहे. (. Post Office Scheme: for 5 years) या योजनेचं नाव पोस्ट ऑफिस एफडी स्कीम आहे. या योजनेत गुंतवलेल्या पैशांच्या बाबतीत कोणतेही जोखीम नसते. ही गुंतवणूक सुरक्षित ठेवणारी योजना आहे. या योजनेत वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास किती व्याज मिळते ते जाणून घेऊयात.
पोस्ट ऑफिस एफडी स्कीमची खासियत
व्याज दर- इतर बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिस योजनेत जास्त व्याज मिळतं.
निश्चित उत्पन्न- व्याज तीन महिन्यांनी खात्यात जमा होतं.
कमी जोखीम-* जोखीम नसलेली गुंतवणूक करणाऱ्यांसाठी योग्य पर्याय.
कालावधी- तुम्ही एक, दोन, तीन किंवा पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता.
पोस्ट ऑफिस एफडी खातं चालू कसं करायचं?
किमान रक्कम- 1000 रुपयांत तुम्ही खातं उघडू शकता.
गुंतवणूक मर्यादा- कमाल गुंतवणुकीला मर्यादा नाही.
खात्याचा प्रकार- एकल किंवा संयुक्त खातं ( जास्तीतजास्त तीन व्यक्ती) उघडू शकतात.
पोस्ट ऑफिस एफडी खाते प्रक्रिया
जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.
कालावधी व मिळाणारा नफा
- एक वर्षांची गुंतवणूक
- व्याज दर: 6.9% वार्षिक
- एकूण रिटर्न: 2,14,161 रुपये
- नफा: 14,161 रुपये
दोन वर्षांची गुंतवणूक
- व्याज दर: 7% वार्षिक
- एकूण रिटर्न: 2,29,776 रुपये
- नफा: 29,776 रुपये
तीन वर्षांची गुंतवणूक
- व्याज दर: 7.1% वार्षिक
- एकूण रिटर्न: 2,47,015 रुपये
- नफा: 47,015 रुपये
पाच वर्षांची गुंतवणूक
- व्याज दर: 7.5% वार्षिक
- एकूण रिटर्न: 2,89,990 रुपये
- नफा: 89,990 रुपये
पोस्ट ऑफिस एफडी गुंतवणुकीचे फायदे
सुरक्षा- पोस्ट ऑफिस सरकारी असल्याने पैसे सुरक्षित राहतात.
निश्चित उत्पन्न- दर तीन महिन्यांनी व्याज मिळतं, त्यामुळे निश्चित उत्पन्न येते.
लवचिकता- तुम्ही तुमच्या सोईने गुंतवणुकीचा कालावधी निवडू शकता.
कर- काही अटींसह तुम्हाला या गुंतवणुकीत कर सुट मिळते.
पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये पैसे सुरक्षित राहतात, ठराविक उत्पन्न तीन महिन्या
ला मिळते. त्यामुळे हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे.
0 टिप्पण्या