पोस्टाची भन्नाट योजना, दर महिन्याला छप्परफाड कमाई करा, गुंतवा केवळ 1,000 रूपये | Post Office Monthly Scheme.


Digital Gaavkari

Post Office Monthly Scheme: पोस्ट ऑफिस मंथली स्कीम या योजनेत चक्क 1000 रूपये भरून देखील तुम्ही गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस मंथलीस स्कीम या योजनेमधून तुम्ही प्रत्येक महिन्याला कमाई करू शकता. आज आपण या लेखातून योजनेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

योजनेमध्ये पैसे गुंतवण्याची लिमिट

या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी 1000 रुपये भरून देखील योजना सुरू करू शकता. त्याचबरोबर या गुंतवणुकीची जास्तीत जास्त लिमिट 9 लाख रुपयांपर्यंत आहे. जर तुम्ही जॉईंट अकाउंट ओपन करत असाल तर, ही लिमिट 15 लाख रुपयांनी एवढी ठेवण्यात आली आहे. तुम्ही जॉईंट अकाउंट ओपन केला असेल तर, सर्वांना समान पैसे मिळतील. त्याचबरोबर नाबालिकांसाठी उघडलेल्या खात्याची सीमा निश्चितच वेगळी असेल.

कोण उघडू शकतो अकाउंट?

पोस्टाच्या मंथली इनकम स्कीममध्ये कोणताही सिंगल आणि दोन वयस्कर व्यक्ती मिळून खाते उघडू शकतात. फक्त दोनच नाहीतर 3 व्यक्ती एकत्र येऊन देखील खातं उघडू शकतात. दरम्यान या योजनेमध्ये नाबालिक देखील स्वतःचं खातं उघडून अकाउंटमध्ये पैसे गुंतवू शकतात.

किती टक्के व्याजदर मिळते?

या योजनेमध्ये सरकार 7.4% व्याजदर देत आहे. तुम्ही ज्या दिवशी अकाउंट ओपन केले असेल त्या दिवसापासून एक महिना पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाते. तुम्हाला मिळणाऱ्या व्याजदरवर टॅक्स लागू केले जाते.

मॅच्युरिटी पिरियड किती आहे?

या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 5 वर्षांचा आहे. समजा मॅच्युरिटी पीरियडआधीच खातेधारकाचा मृत्यू झाला तर, हे अकाउंट बंद केलं जातं आणि जमा असलेली रक्कम संबंधित ओळखीच्या व्यक्तीला दिली जाते. त्याचबरोबर तुम्ही तुमचं खातं ओपनिंग तारखेच्या एक वर्षानंतर आणि तीन वर्षाआधी बंद करत असाल तर, मूलधनातून 2% कापून घेतले जातात आणि बॅलन्स राहिलेल्या पैशांचं पेमेंट तुम्हाला केलं जातं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या