डिजिटल गावकरी
दुर्गाप्रसाद घरतकर
नमस्कार मंडळी, राज्यातील विधानसभा निवडणुक 2024 चां आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झालंय हे पथक आयुक्त राजू कुमार यांच्या नेतृत्वात शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस राज्यात विधानसभा निवडणुकांचा आढावा घेणार आहे आयोगाचे अधिकारी शुक्रवारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी राज्याचे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत शुक्रवारी राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन झाल्यानंतर शनिवारी निवडणूक आयोगाचे अधिकारी एक पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेतून ते राज्यातील निवडणुकीच्या तयारीची माहिती देऊन पुढच्या 10 दिवसात निवडणुकांची अधिसूचना येण्याची शक्यता आहे आता या सगळ्या घडामोडी पाहता 15 ते 17 नोव्हेंबर पर्यंत राज्यात मतदान होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय तर 20 नोव्हेंबरला राज्याचा निकाल लागू शकतो असं बोललं जात आहे.
त्याच दृष्टीने आता राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले दिसतात लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी जागा मिळवत आणि कमी जागा जिंकत शेवटचा नंबर मिळवलेला अजित पवार गट या तयारीत पहिल्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळतंय त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटान विधानसभा निवडणुकीपूर्वी एक सर्वे जाहीर केलाय पण या सर्वेत दादांचे फक्त 23 आमदार जिंकतील असा धक्कादायक रिपोर्ट समोर आलाय आता या सर्वेत नेमके काय अंदाज व्यक्त करण्यात आलेत सर्वे नुसार अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळू शकतात ते या बातमिमधून जाणुन घेणार आहोत.
जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार 2 जुलैला राष्ट्रवादीतील 40 आमदारांना सोबत घेऊन महायुतीत सामील झाले त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत दादा गटाची फक्त चार जागांवर बोळवण झाली त्यातही त्यांना एकच जागा जिंकता आली आहे.
बारामती गमवावी लागली मात्र त्यानंतर पीआर कंपनीच्या मदतीने अजित पवार जोरदार कामाला लागलेत अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर अजित पवारांनी पिंक थीम घेत योजनेचा आणि स्वतःचा प्रचार करायला सुरुवात केली आता अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत 70 जागांवर वर दावा केलाय.(Vidhansabha election 2024 in Maharashtra NCP Survey)
महायुतीच्या जागा वाटपात त्यांना किमान 70 जागा हव्यात त्याच दृष्टीने अजित पवार गटाला अपेक्षित असलेल्या 70 विधानसभा मतदारसंघाचा सर्वे अजित पवार गटाकडून करण्यात आलाय महत्त्वाचं म्हणजे या 70 पैकी अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीत केवळ 23 जागांवर विजय मिळू शकतोय असे अंदाज या सर्वेत व्यक्त करण्यात आलेत तर 16 असे मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघात अजित पवार गटाला विजयासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे असे अंदाज आहेत. यामध्ये काही महत्त्वाच्या मंत्र्यांच्या मतदारसंघांचा देखील समावेश आहे थोडक्यात 23 आणि 16 असे मिळून 39 जागांवर अजित पवारांचे उमेदवार निवडून येऊ शकतात पण 23 जागा दादांना फिक्स मिळतीलच असे अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आलेत त्याचबरोबर या सर्वेनुसार विधानसभा निवडणुकीत महायुती आणि अजित पवार गटाचा परफॉर्मन्स चांगला राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
याशिवाय 31 मतदारसंघात अजित पवार गटाची परिस्थिती कठीण असणार आहे या 31 पैकी 21 मतदारसंघात जर शिंदे गटाची आणि भाजपची मत अजित पवार गटाच्या उमेदवाराकडे वळवण्यात यश आलं तरच अजित पवार 21 जागा जिंकू शकतील तर 31 पैकी 10 मतदारसंघांमध्ये मात्र अजित पवार गट विरोधकांच्या तुलनेत कमकुवत असल्याचे अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आलेत थोडक्यात आत्ताची परिस्थिती अजित पवारांना पूरक असल्याचा दावा या अंतर्गत सर्वेतून व्यक्त करण्यात आलाय पण या सर्वेचे अंदाज आत्ताच्या परिस्थितीत किती अनुकूल आहेत एकीकडे दादांकडे गेलेल्या 40 पैकी अनेक आमदार माघारी फिरणार अशा चर्चात जागा वाटप जाहीर झाल्यावर अनेक जण भूमिका बदलण्याच्या तयारीत आहेत ज्यामध्ये अतुल बेणके चेतन तुपे नरहरी झिरवळ यांची नाव येतात तर दुसरीकडे अजित पवारांकडे असलेल्या जागांवरती शरद पवारांनी माणसाला माणूस लावायला सुरुवात केली आहे कागल मध्ये हसन मुशरीफा विरोधात समर्जीत घाडगे वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे विरोधात बापू पठारे परळीत धनंजय मुंडे विरोधात राजे भाऊ फड किरण लहामटे विरोधात अमित भांगरे अशी माणसं पवारांनी लावलीत यामध्ये हळूहळू वाढ होते त्यामुळे अजित पवारांना घेरण्यासाठी शरद पवारांनी सगळी तयारी केली आहे अजित पवार बारामतीतून लढणार की नाही याचा सुद्धा इम्पॅक्ट इतर जागांवर होणार आहे त्यामुळे या सर्वेमध्ये जागानुसार कोणत्याही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या नसल्याने हा सर्वे केवळ जागा वाटपात भागीदारी वाढवण्यासाठी करण्यात आल्याची टीका होताना दिसते आहे .
आता पुढचा मुद्दा म्हणजे महायुती बाबत सर्वेत नेमके काय अंदाज आहेत तर राष्ट्रवादीच्या अंतर्गत सर्वे मधून महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती मतदान होईल याचे देखील अंदाज व्यक्त करण्यात आलेत या आधी सुद्धा काही संस्थांचे सर्वे आलेले ज्यात जुलै मध्ये करण्यात आलेल्या सर्वेत महायुतीला 3468% मतदान होईल असा अंदाज होता तर महाविकास आघाडीला 432% मतदान होण्याचा अंदाज होता त्यानंतर ऑगस्ट मध्ये करण्यात आलेल्या सर्वेत महायुतीला 371% मतदान होईल असा अंदाज होता तर महाविकास आघाडीला 4243% मतदान होण्याचे अंदाज होते थोडक्यात दोन्ही सर्वेमध्ये महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला जास्त मतदान मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते मात्र आता राष्ट्रवादीने सप्टेंबर महिन्यात केलेल्या ताज्या सर्वेमध्ये 393% लोकांनी महायुतीला मतदान करणार असल्याचं सांगितलंय तर 386% लोकांनी राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिलाय त्यामुळे मागील तीन महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबर मध्ये राज्यातील मतदार महायुतीच्या बाजूने चांगले प्रतिसाद देण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय यामध्ये मुख्यतः महायुतीने विकास कामांवर सुरू केलेला प्रचार लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले हप्ते यामुळे सप्टेंबर मध्ये महायुतीच्या बाजूने लोक कौल देत असल्याचं सर्वेत सांगण्यात आलंय आता अजित पवार यांच्या कामगिरीवर राज्यातील जनता किती समाधानी आहे तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या कामावर राज्यातील बहुतांश लोक समाधानी आहेत असं राष्ट्रवादीच्या अंतर्गत सर्वेतून पाहायला मिळतंय.
अजित पवारांच्या कामगिरीवर 4838% लोक खूप समाधानी असल्याचं सांगण्यात येतंय तर 1060% लोक अजित पवारांच्या कामावर केवळ समाधानी असल्याचं पाहायला मिळते याशिवाय 4.28 टक्के लोक अजित पवारांच्या कामावर असमाधानी आहेत तर 2761% लोक अजित पवारांच्या कामगिरीवर खूप असमाधानी असल्याचं या सर्वेतून सांगण्यात आलंय आता या सर्वेवर राष्ट्रवादीकडून समाधान व्यक्त करण्यात येतंय लोकसभा निवडणुकीत आम्हाला केवळ सहा मतदारसंघात आघाडी होती मात्र आता विधानसभा निवडणुकीत हाच आकडा 23 वर पोहोचलाय या 23 जागा आम्ही सहज जिंकू शकतोय 16 जागांवर फेरबदलाची आवश्यकता आहे तर इतर प्रतिकूल असलेल्या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपची साथ मिळाली तर त्या जागा देखील जिंकू शकतो असं अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे आता अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या सर्वेतून अजूनही राज्यात महायुती बाबत तितकच सकारात्मक वातावरण दिसत नाहीये तर दुसरीकडे अजून महायुतीचा जागा वाटप जाहीर झालेलं नसतानाच अजित पवार गटाने 70 मतदारसंघाबाबतचा आपला सर्वे जाहीर केलाय अजित पवारांकडे सध्या 40 आमदार आहेत 2019 ला संपूर्ण पक्षाने जिंकलेल्या 54 जागांचा हिशोब अजित पवार लावतात आणि वर एक्स्ट्राच्या जागा मागतात पण गेल्या वर्षभरात शरद पवारांसोबत असणाऱ्या 14 जागांवर अजित पवार आपली माणसं तयार करू शकलेले नाहीयेत अशा वेळी 54 जागा मिळाल्या तरी जयंत पाटील असोत व रोहित पवार अशा जागांवर अजित पवार आपल्या गटातून कोणाला उभा करणार हा प्रश्न आहे .
पर्यायाने अजित पवारांकडे 40 जागा उरतात अशा वेळी भाजपच्या जागांवर क्लेम करण्यापेक्षा गतवेळी शिवसेनेसोबत लढवलेल्या जागा पण जिथले उमेदवार आज ठाकरेंसोबत आहेत अशा काही मोजक्या जागांवर अजित पवार क्लेम करू शकतात पण या जागांची बेरीज देखील अजित पवारांना 45 च्या पुढे पुढे घेऊन जाताना दिसत नाही साहजिकच लढण्यासच 40 ते 45 जागा मिळाल्या तर अजित पवार किती टिकवणार हा प्रश्न अजित पवार गटासमोर असणार आहे महायुतीत भाजप 150 पेक्षा जास्त तर एकनाथ शिंदे 100 पेक्षा जास्त जागांसाठी आग्रही आहेत अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांना 70 जागा मिळणं अशक्य असल्याचं पाहायला मिळतंय तरीदेखील अजित पवारांनी 70 मतदारसंघाच्या अनुषंगाने हा सर्वे का केलाय या सर्वेच्या माध्यमातून महायुतीवर 70 जागांसाठी दबाव निर्माण करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे का सर्वेत आलेल्या अंदाजानुसार पवारांचे 23च उमेदवार जिंकतील का तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
0 टिप्पण्या