Nana Patole यांच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस नेते तयारीत ! Maharastra Vidhansabha Election.


डिजिटल गावकरी
दुर्गाप्रसाद घरतकर


आगामी विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावं नानांना मुख्यमंत्री पद नाही मिळालं तर आम्ही ते हिसकावून घेऊ असा इशारा दिलाय काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी एकीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातंय खासदार संजय राऊत सुद्धा मुख्यमंत्री ठाकरेच असावेत असं वारंवार सांगताय तर दुसरीकडे विदर्भातील काँग्रेस आमदारांनी एक मुखाने मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांच्या नावाचा आग्रह केल्याने फक्त काँग्रेस मध्येच नव्हे तर विकास आघाडीतच खळबळ उडाली आहे.

नागपुरात नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची नागपूर शहरासाठीची आढावा बैठक पार पडली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भाचे सहप्रभारी कुणाल चौधरी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आमदार नितीन राऊत आमदार अभिजीत वंजारी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी अनिस अहमद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अतुल कोटेचा प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे विशाल मुक्तेमार प्रामुख्य उपस्थित होते या बैठकीत अनेक काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली नानांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केली आहे नाना पटोलेमुळेच काँग्रेसला आजचे दिन आलेत नाना पटोले यांच्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि त्याचा पुरस्कार नाना पटोले यांना मिळायला पाहिजे तो जर मिळाला नाही तर आम्ही विदर्भवाले तो हिसकावून घेऊ असं म्हणत विकास ठाकरे यांनी फक्त महाविकास आघाडीलाच नव्हे तर थेट काँग्रेस हाय कमांडला इशारा दिलाय.

पण नाना पटोले यांचे मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस आहेत किती अशी कोणती कारण आहे ज्यामुळे नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकतात चला याबाबत इन डेप्थ आढावा घेऊया नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकतात याचं पहिलं कारण म्हणजे महाविकास आघाडीतील काँग्रेसची ताकद 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यावेळी काँग्रेस छोट्या भावाच्या भूमिकेत होता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या तुलनेत काँग्रेसचे आमदार कमी असल्याने प्रत्येक वेळी पक्षाला नमती भूमिका घ्यावी लागली अगदी मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात सुद्धा अगदी हलकी आणि जास्त महत्त्व असणारी खाती देऊन काँग्रेसच्या तोंडाला पाने पुसण्यात आली होती परंतु आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस हा आपोआपच मोठा भाऊ झालाय शिवाय एक राष्ट्रीय पक्ष म्हणून अगदी ताळागाळापर्यंत असलेल्या कार्यकर्त्यांच्या जाळ्यामुळे काँग्रेसचं महत्व महाविकास आघाडीत नक्कीच वाढलंय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण हे बघितलं सुद्धा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे 17 जागा लढवून तब्बल 13 ठिकाणी आपले खासदार निवडून आले तर दुसरीकडे ठाकरेंना 21 जागा लढवूनही अवघ्या नऊ जागाच जिंकता आल्या शरद पवारांनी आपल्या पक्षाची मर्यादा लक्षात घेऊन फक्त 10 जागा लढवल्या आणि त्यातील आठ जागा जिंकल्या सांगायचं तात्पर्य काय तर महाविकास आघाडीत आता काँग्रेसचा बोलबाला सुरू झालाय लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीत काँग्रेसचे जास्त आमदार निवडून येण्याची शक्यता आहे त्यामुळे मुख्यमंत्री पद आपोआपच काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट आहे.

त्यामुळेच काय नाना पटोले यांच्या समर्थकांनी आधीपासूनच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर दावा ठोकलाय काँग्रेसकडे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार सतीश पाटील सारखे दिग्गज नेते मात्र प्रत्येकाला राजकीय मर्यादा आहे अशा वेळी सर्व समावेशक चेहरा म्हणून नाना पटोले यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येऊ शकतं नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकतात याचं दुसरं कारण म्हणजे त्यांचा आक्रमक बाणा भाजप वर थेटपणे टीका करणारे जे कोणी मोजके नेते आहेत त्यामध्ये नाना पटोले यांचं नाव अग्रसर स्थानी येतो खरं तर नाना पटोले यांचा राजकीय प्रवास काँग्रेस भाजप काँग्रेस असा राहिलाय नाना पटोले यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी नानांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांना पराभवाचं पाणी सुद्धा पाजलं मात्र त्यानंतर भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही असं म्हणत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा काँग्रेसमध्ये परतले संपूर्ण देशात भाजपचे अच्छे दिन असताना आणि अनेक विरोधक सत्तेसाठी भाजपमध्ये जात असताना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्न प्रश्नासाठी सत्तेला लात मारणारे नाना पटोले हे देशातील पहिलेच नेते होते यातून त्यांचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा सुद्धा दिसून येतो शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणारा नेता अशी त्यांची ओळख आणखी मजबूत झाली सध्याच्या आक्रमक राजकारण आणि ईडी सीबीआयचा गैरवापर बघता मुख्यमंत्री पदी त्याच आक्रमकतेचा आणि ईडी सीबीआयची कसलीही भीती नसलेल्या खमक्या नेत्याची गरज महाविकास आघाडीला आहे म्हणूनच नाना पटोले मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार ठरतात नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकतात याचं तिसरं कारण म्हणजे ते विदर्भातून येतात 2019 च्या विधानसभेला काँग्रेसला सर्वाधिक यश विदर्भातून मिळालं होतं तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा विदर्भात काँग्रेसचे एक हाती वर्चस्व पाहायला मिळालं काँग्रेसने गडचिरोली अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि रामटेक अशा पाच लोकसभेच्या जागांवर आपला झेंडा फडकवला आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा विदर्भात काँग्रेस जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही असून विदर्भात पुन्हा एकदा काँग्रेस भाजपला धोबी पछाड देऊ शकतो असंही बोललं जातंय.

अशा वेळी विकास ठाकरे यांच्याप्रमाणे विदर्भातील काँग्रेसचे इतर आमदार सुद्धा एक मुखाने नाना पटोले हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी काँग्रेस हायकमांड वर दबाव टाकू शकतात त्यातच दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचे देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे हे बडे नेते सुद्धा विदर्भातूनच येतात अशा वेळी या नेत्यांच्या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठी त्याच विदर्भाच्या मातीतील आक्रमक अशा नाना पटोलेंना आणखी बळ देण्याचा डाव काँग्रेस हायकमांड खेळू शकते नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकतात याचं चौथं कारण म्हणजे ओबीसी चेहरा नाना पटोले हे कुंभी ओबीसी समाजातून येतात सध्या महाराष्ट्रात जातीचं राजकारण चांगलंच तापलंय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज दरांगे पाटील हे आग्रही आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज दरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका करत आहे यामुळे भलेही मराठा समाज हा भाजपच्या विरोधात गेला असला तरी बिथरलेला ओबीसी समाज मात्र भाजपकडे जाऊ लागलाय हा वास्तव आहे अशा वेळी जातीचे समीकरण राखण्यासाठी आणि ओबीसी मतदार पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्यासाठी नाना पटोले यांच्यासारखा मुंबी ओबीसी चेहरा मुख्यमंत्री करण्याचा मास्टर स्ट्रोक काँग्रेस आणि महाविकास आघाडी खेळू शकते.

यामुळे सुधाकर राव नाईक यांच्या नंतर प्रथमच महाराष्ट्राला ओबीसी मुख्यमंत्री मिळेल आणि याचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकतात याचं पाचवं कारण म्हणजे सध्याच्या महाराष्ट्र काँग्रेसची परिस्थिती मागील काही वर्षात अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसला राम राम केल्यानंतर अगदी काही मोजकेच अनुभवी नेते महाराष्ट्र काँग्रेसकडे आहेत यात प्रामुख्याने पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात नाना पटोले सतीश पाटील विश्वजीत कदम संग्राम थोपटे अमित देशमुख अशी काही नाव आहेत मात्र बहुतांश नेत्यांना मतदारसंघापूर्वी मर्यादा आहे अशा वेळी नेतृत्व करण्याची क्षमता आक्रमकपणा दिल्लीत सुद्धा राजकीय वजन असलेला मोदी शहा आणि फडणवीसांना थेट शिंगावर घेणारा शेतकऱ्यांची जाण असणारा नेता म्हणून नाना पटोले यांच्या नावाला पसंती मिळू शकते बाकी तुम्हाला काय वाटतं नाना पटोले महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री होऊ शकतात का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय माहितीसाठी डिजिटल गावकरी या मराठी वेबसाइटलां फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या