
डिजिटल गावकरी.
नमस्कार मंडळी,राज्याच्या बहुतांश भागात मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे खरीप पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालय हवामान विभागाने आजही राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज दिलाय मात्र उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
मान्सूनने 23 सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरात मधून माघार घेतली होती तर 24 नोव्हेंबरलाही आणखी काही भागात मान्सून परतला होता मात्र 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान मान्सून एकाच जागेवर होता म्हणजेच आजही मान्सूनचा प्रवास थबकला होता हवामान विभागाने आज रायगड पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोर पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय तर कोकणातील रत्नागिरी आणि ठाणे तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे तसेच जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलाय विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलोलट कायम ठेवण्यात आलाय तर उद्या मध्य महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा आणि नागपूर जिल्ह्या काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय.
तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तसेच रविवार सोमवार आणि मंगळवारी राज्यात पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
0 टिप्पण्या