Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचं जोर रेड अलर्ट जारी.

Maharashtra Rain updates 

Maharashtra Rain news: नमस्कार मंडळी, महाराष्ट्रात मान्सूनचा हंगाम जोर धरत असून, येत्या दोन दिवसांत राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विदर्भातील इतर जिल्हे तसेच मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्येही मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

विदर्भ: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मध्यम पाऊस.

मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस.

कोकण आणि मध्य महाराष्ट्र:कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे.

अनेक जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट जारी

IMD ने विदर्भ, मराठवाडा आणि कोकण-मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे या प्रदेशांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या