डिजिटल गावकरी
नमस्कार मंडळी,राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आता या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबरला होणार आहे.
याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज माहिती दिली आहे. या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये मिळणार आहेत.
या योजनेचा तिसरा कार्यक्रम हा 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्ज धारकांना लाभ मिळणार आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
0 टिप्पण्या