डिजिटल गावकरी
दुर्गाप्रसाद घरतकर
आजपासून परतीचा पाऊस सुरु होणार असून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्याला पाऊस झोडपून काढणार`, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
आज सोमवारपासून पुढील काही दिवस मुंबईसह, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात तुफान पाऊस
● मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचे प्रमाण मध्यम ते जोरदार राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, धाराशिव जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
● लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी तयारीत राहणे गरजेचे आहे.
विदर्भातही पावसाचा इशारा
● बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
● अकोला व अमरावती जिल्ह्यांत २ ते ५ मिमी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
● वर्धा व नागपूर जिल्ह्यात ६ ते ९ मिमी, तर यवतमाळ जिल्ह्यात १९ मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे.
● गोंदिया जिल्ह्यात ५ ते ७ मिमी, भंडारा जिल्ह्यात ४ ते ७ मिमी, चंद्रपूर जिल्ह्यात ११ ते १४ मिमी व गडचिरोली जिल्ह्यात १२ ते १४ मिमी पावसाची शक्यता आहे.
● पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व नगर जिल्ह्यांत ५ मिमी, तर सांगली व सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातही दिवसभर पावसाची शक्यता आहे. पुणे व नगर जिल्ह्यांत ताशी १० ते १३ किमी राहील.
● पुणे आणि नवी मुंबईतील काही भागात सोमवारी सकाळपासूनच पाऊस सुरु झाला आहे.

0 टिप्पण्या