नमस्कार मंडळी “ शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजना” या योजनेंतर्गत भटक्या जमाती - क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर योजना ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंच्या धर्तीवर राबविण्यात येणार असल्याने सदर योजनेसंदर्भात शासन वेळोवेळी जे निर्णय घेईल ते सर्व निर्णय, अटी व शर्ती संदर्भाधिन शासन निर्णय क्र.०१ अन्वये या योजनेसाठी लागु केलेल्या आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजना” या योजनेंतर्गत जिल्हाधिकारी, परभणी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या व सहायक आयुक्त, समाजकल्याण, परभणी यांनी संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये शासनास सादर केलेल्या एकूण ३,६८३ लाभार्थ्यांच्या प्रस्तावास (लाभार्थ्यांची यादी - परिशिष्ट- अ० सोबत जोडली आहे.) संबंधित शासन निर्णयातील अटी शर्तींच्या अधिन राहून शासनाची मंजूरी देण्यात येत आहे. परभणी जिल्हयातील उक्त ३६८३ लाभार्थ्यांकरिता प्रति लाभार्थी रु.१.२० लक्ष प्रमाणे एकूण रु.४५,९६,३८,४०० /- (अक्षरी रुपये पंचेचाळीस कोटी शहाण्णव लाख अडतीस हजार चारशे फक्त) इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तुर्त, एकूण निधीपैकी सदयस्थितीत विभागाकडे उपलब्ध निधी लक्षात घेता, रु.३,५०,००,०००/- (अक्षरी रुपये तीन कोटी पन्नास लाख फक्त) इतका निधी वितरित करण्या येत असून उर्वरित निधी या योजनेंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.
0 टिप्पण्या