नमस्कार मंडळी, आजचा काळात शेतकऱ्यांना शेती करताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी अस्मानी, कधी दुष्काळ तर कधी बाजार भावामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित नेहमीच कोलमडते. त्यामुळे शासन शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत असते. आज अश्याच एका योजनेचे माहिती तुम्हाला देणार आहोत ज्यामुळे तूम्ही या शेतीसाठी आवश्यक यंत्राने 50% अनुदानावर मिळवू शकता.
कृषी यांत्रिकीकरण योजना 2024
मंडळी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रांसाठी 50% अनुदानावर कृषी यंत्र मिळणार आहेत. यासाठी पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत कृषी यंत्रांसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.
ही यंत्र मिळणार 50 टक्के अनुदानावर
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे 50 टक्के अनुदानावर कृषी औजारांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
30 सप्टेंबरपर्यंत पंचायत समितीमध्ये यासाठी अर्ज सादर करायचे आहे.
कृषी औजारांमध्ये 50 एचपीचा ट्रॅक्टर, कडबाकुटी, ट्रॅक्टरचलित पल्टीनांगर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर आणि पीव्हीसी पाइप यांचा समावेश आहे इत्यादी वस्तू तुम्हाला पंचायत समिती द्वारे मिळणारं आहेत त्यासाठि आपल्याला पंचायत समिती मध्ये जाऊन ऑफलाईन फार्म भरून घ्यायचा आहे.
0 टिप्पण्या