Digital Gaavkari News
दुर्गाप्रसाद घरतकर
नमस्कार मंडळी, आज महाराष्ट्र राज्य हा पारंपरिक पद्धतीच्या शेतीकडे जास्त वळला आहे महाराष्ट्रातील एका शेतकऱ्यांनी कर्तुले ची शेती करून महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊन प्रगतशील शेतकरी होण्याचे नाव उंचावले आहे आणि आज आपण या लेखामध्ये त्यांची संपूर्ण माहिती आणि कर्तुलेची शेतीची माहीती जाणून घेणार आहोत.
कृष्णा फलके हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या तळेगावचा तरुण शेतकरी आहे याने 2019 पासून करटुल्याची लागवड करतोय कृष्णानं स्थानिक कृषी कार्यालयाकडून करटुले लागवडीबद्दल अधिक माहिती घेतली आणि पहिल्यांदा अर्धा एकर क्षेत्रावर त्याने करटुल्याची लागवड केली. आणि गेल्या चार वर्षांमध्ये त्याला शेतीन चांगलीच साथ दिली आहे.
आपल्या शेतात नवीनच भाजपले कर्तुले लावणारे शेतकरी कृष्णा सांगतात की कर्तुळे पिकामुळे मी स्वतःचे कर्ज चुकते केली कर्तुले हे पावसावर आधारित पीक आहे ज्याला इतर पिकांच्या तुलनेत कमी पाणी लागते कार्तुले लागवडीचा खर्च कमी असून तो बाजारात जास्त दराने विकता येतो.
कृष्णाने आपल्या 2 एकर शेतात कर्तुले पिकाची लागवड करून यातून त्यांना लाखो रु.चा नफा झाला आहे. या पिकातून 70,000 रु. त्यांनी आपले कर्ज फेडले आहे.
आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी करतुळे पीक हा चांगला पर्याय आहे असे त्याचे म्हणणे आहे. हे पिक कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे आणि या पिकातून तुम्ही महिन्याला 1 ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पादन घेऊ शकता असे कृष्णाचे म्हणे आहे.
0 टिप्पण्या