PM surya Ghar mukt Bijli Yojna 2024photos
नमस्कार मंडळी,पीएम सूर्य घर मोफत बिजली योजना ही एक सरकारी योजना आहे ज्याचा उद्देश भारतामध्ये घरांसाठी मोफत वीज उपलब्ध करून देणे आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी, 2024 मध्ये सुरू केलेली आहे या योजनेद्वारे सामान्य घरासाठी छतांवर सोलर पॅनेल लावण्यासाठी सब्सिडी देण्यात येते सब्सिडी सोलर पॅनेलची किंमत 40% पर्यंत राहील ही योजना संपूर्ण भारतामध्ये 1 करोड घरांना लाभ देण्यासाठी तयार केली गेली आहे अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवून १ कोटी घरांना प्रकाश देण्याचे आहे. या योजनेची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे तरी लेख शेवटपर्यंत वाचा.
पीएम सूर्य घर मोफत बिजली योजनेसाठी पात्रता.
कुटुंबातील सदस्य हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
कुटुंबाकडे सौर पॅनेल बसवण्यासाठी योग्य छप्पर असलेले घर असणे आवश्यक आहे.
घरात वीज जोडणी मीटर असावी.
कुटुंबाने सौर पॅनेलसाठी इतर अनुदानाचा लाभ घेतला नसावा.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,0000 रुपया पेक्षा कमी असावे.
पीएम सूर्य घर मोफत बिजली योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
आधार कार्ड
निवास प्रमाण पत्र
राशन कार्ड
वीज बिल
इन्कम प्रमाण पत्र
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट साइज फोटो
पीएम सूर्य घर मोफत बिजली योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?
पीएम सूर्य घर मोफत बिजली योजनेसाठी ऑनलाईन अर्जे करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्ही ऑलाईन सेंटर मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकता किंवा तुम्ही खालील सांगितलेल्या पद्धतीनुसार घरून अर्ज सुद्धा करू शकता.
सर्वप्रथम तुम्ही या pmsuryagarh.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा
तिथे गेल्यावर रजिस्टर Singe up पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर त्यामधे आपले राज्य निवडा
त्यानंतर आपली वीज वितरण कंपनी निवडा
त्यानंतर आपली वीज ग्राहक नंबर प्रविष्ट करा
त्यानंतर आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करा
त्यानंतर ईमेल आयडी प्रविष्ट करा
नंतर कृपया दिलेल्या निर्देशांचे पालन करा.
यांनतर तुम्हाला मिळालेल्या ग्राहक संख्या आणि मोबाईल नंबर सोबत लॉग इन करा.
फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.
आता Discom कडून व्यवहार्यता मंजुरीची प्रतीक्षा करा.
एकदा तुम्हाला व्यवहार्यता मान्यता मिळाल्यावर तुमच्या डिस्कॉममधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करा.
इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांटचे तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर, ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.
तुम्हाला एक कमिशनिंग रिपोर्ट मिळेल.
त्यानंतर पोर्टलद्वारे तुमचा बँक खात्याचे तपशील आणि कॅन्सल चेक सबमिट करा. तुम्हाला तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत मिळेल.
0 टिप्पण्या