Digital Gaavkari News
Edit By: दुर्गाप्रसाद घरतकर
Pune Rain news Today :
गेल्या २४ तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे, पाण्याची पातळी ही वाढतच चालली आहे त्यामुळे शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, धरणातून वाढीव दराने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत असून, जवळपासच्या भागात पूर आला आहे.
शहरातील पूरग्रस्त रस्ते, पाण्याखाली गेलेली घरे आणि लोकांना बोटीद्वारे वाचवले जात असल्याचे दाखवले आहे. पाऊस आणि पुरामुळे किमान चार जणांचा मृत्यू झाल्याची आतापर्यंत नोंद आहे. स्थानिक प्रशासनाने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे आणि अत्यंत आवश्यक असल्याशिवाय बाहेर पडू नये असे सुद्धा सांगितले आहे .
पुण्यातील काही भागात दरड कोसळण्याचा धोका असल्याचेही सांगण्यात आले आहे. लवासा येथे यापूर्वीच भूस्खलन झाले असून, दोन बंगले ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. बंगल्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना शोधण्यासाठी बचावकार्य तिथे सुरू आहे.
पुण्यामध्ये पावसाने जबरदस्त हजेरी लावली असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला त्याचबरोबर अनेक दुकानामध्ये पाणी घुसले असून व्याारीदृष्ट्या नुकसानीचे प्रमाण वाढले आहे.

0 टिप्पण्या