
Mukhyamantri Annapurna Yojana: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर देखील समाविष्ट आहेत. गॅस सिलेंडरच्या दरांचा विषय नेहमीच चर्चेत राहतो, आणि यावर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील काही कुटुंबांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. मात्र, ही योजना सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे . योजनेसाठी काही नियम आहेत, आणि योजनेतून राज्यातील ५६ लाख १६ हजार कुटुंबांना फायदा होणार आहे.
अजित पवार यांनी केलेली ही घोषणा विशेषतः महिलांना दिलासा देण्यासाठी करण्यात आली आहे. महिलांवर किचनचा खर्चाचा मोठा भार असतो, आणि गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने त्यांना आर्थिक ताण येतो. त्यामुळे, राज्य सरकारने बीपीएल रेशनकार्ड, अर्थात पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याचे ठरवले आहे. यासाठी महिलांना सिलेंडरचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत, ज्यामुळे राज्यातील तब्बल ५६ लाख १६ हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे.
0 टिप्पण्या