जाहिरात वाचून पुणे MIDC मध्ये जॉबला जाणार असाल तर सावधान.


डिजिटल गावकरी
दुर्गाप्रसाद घरतकर

Pune MIDC Job froud News
पेपरमध्ये किंवा व्हाट्सअप वरील जाहिरात पाहून रांजणगाव एमआयडीसीमध्ये नोकरी करण्यासाठी जात असाल तर डिजिटल गावकरी ने रांजणगाव MIDC मध्ये सुरु असलेल्या घोटाळ्याच्या नोकरीच्या ऑफरबद्दल लोकांना सतर्क करते आहे

पुण्यातील एक टोळी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना टार्गेट करत असल्याचं घडत आहे.ही टोळी वर्तमानपत्रात तसेच व्हॉटसअप, फेसबुक च्या माध्यमातून नोकरीच्या खोट्या जाहिराती देऊन बेरोजगार मुलां मुलींना नोकरीची आमिष दाखवतात. जाहिरातींमध्ये एलजी (Lg )कंपनीत 16,000 ते रु. 24,000. रु. पगारासह कायमस्वरूपी नोकरी देण्याचे ते आश्वासन देतात.

त्यानंतर मुला मुलींना एका फोन नंबरवर कॉल करून त्यांना जॉइनिंग फी २००० भरण्यास सांगितले जाते. त्यांना दोन फोटो आणि एक ओळखपत्र पाठवायला सांगतात . आणि त्यानंतर ते पुणे ला यायला सांगतात रांजणगावला पोहोचल्यानंतर त्यांना एका दुर्गम ठिकाणी नेऊन कारखान्यात काम करण्यास भाग पाडतात किंवा ज्यांना मार्केटिंग मध्ये फसवतात त्यांना 30 ते 40 हजार रुपये बिजनेस मध्ये लावायला सांगतात आणि हा बिजनेस केल्याने तुम्ही लखपती होऊ शकता मी महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कमवू शकता अशा खोट्या गोष्टी सांगितलेल्या जातात आणि यामध्ये त्यांना फसवले जाते महाराष्ट्रातले अनेक मुला-मुली या कुठे जाहिरातींना बडी पडून आपल्या करिअर खराब केले आहे. आणि यामधून जर लिहिण्याचा प्रयत्न केल्यावर घरी येण्याच्या प्रयत्न केला किंवा काम सोडण्याचा प्रयत्न केल्यास हे लोक त्या मुला मुलींना धमकावले जाते त्यांना मारण्याच्या धमका दिल्या जातात .

पुणे मध्ये ह्या अशा फसवणुकीच्या कामे 2016 पासून सुरु आहेत प्रायव्हेट जॉब देणारी टोळी पुणे एमआयडीसी भागात कार्यरत असून तिने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा दावा अनेक बेरोजगार मुला-मुलींनी केला आहे आहे. या फसवणाऱ्या टोळीविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे आणि तरुण मुला मुला मुलींना अशा खोटारड्या नोकरीच्या जाहिरातींपासून सावध राहण्याचा इशारा पोलीस विभागाने देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या