IND vs SA T20 World Cup: भारत बनला विश्वविजेता, भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला.

image source: Facebook-ICC

Digital Gaavkari News
दुर्गाप्रसाद घरतकर


IND vs SA T20 World Cup Letest News : भारत पुन्हा एकदा क्रिकेटचा विश्वविजेता बनला आहे. भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून T20 विश्वचषक 2024 ट्रॉफी जिंकली आहे. भारताने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा चोकर्स टॅग काढण्याचा प्रयत्न फसला. या स्पर्धेत भारतीय संघ एकही सामना हरला नाही. T20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने एकही सामना न गमावता ट्रॉफी जिंकली आहे.

भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा एमएस धोनीच्या टीमने या फॉरमॅटमध्ये भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवले होते. भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषकही जिंकला आहे. पहिल्यांदा 1983 मध्ये आणि दुसऱ्यांदा 2011 मध्ये. आयसीसी ट्रॉफीबद्दल बोलायचे झाले तर भारताला तब्बल १३ वर्षांनंतर ही ट्रॉफी मिळाली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी बार्बाडोसमध्ये टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 176 धावा केल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेला 169 धावांवर रोखून ट्रॉफी जिंकली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या