
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मदत
योजनेचा उद्देश:
शेती व्यवसायात काम करताना अपघातग्रस्त होणाऱ्या किंवा अपंग होणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत प्रदान करणे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, विशेषतः पाण्यात बुडून मृत्यू होणे, कीटकनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे होणारी विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने किंवा वीज पडणे, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या, जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा त्यांच्या चावण्यामुळे जखमी किंवा होणारे मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात यामुळे मृत्यु झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते, अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस / त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता शासनाकडून रु. २ लाख पर्यंत लाभ देण्यात येतो. सदर सुधारित योजने अंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे एकुण २ जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर योजना दि. ९ डिसेंबर, २०१९ पासून राबविण्यात येत आहे.
योजनेचे लाभार्थी
महाराष्ट्र राज्यातील वहितीदार खातेदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य (आई-वडील, पती/पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी)
अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास लाभ मिळण्यासाठी अर्ज करू शकतात.
योजनेचं लाभ अनुदान रक्कम
अपघाती मृत्यू: ₹2 लाख
दोन्ही डोळे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास: ₹2 लाख
एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास: ₹2 लाख
एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास: ₹1 लाख
यासाठी पात्रता
अपघात हा शेती व्यवसायात काम करताना झाला पाहिजे.
अपघाताचा मृत्यू किंवा अपंगत्वाचा दाखला आवश्यक आहे.
7/12 उतारा, मृत्यूचा दाखला, वारसा हक्क, वय पुरावा, आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा व कुठे करायचं
अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी 30 दिवसांच्या आत जवळच्या तालुका कृषी
अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
तालुका कृषी अधिकारी अर्ज आणि कागदपत्रांची तपासणी करतील आणि पात्रतेनुसार लाभ मंजूर करतील.
टीप:
अधिक माहितीसाठी, आपण आपल्या जवळच्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
https://krishi.maharashtra.gov.in
या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही योजना आणि अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.
0 टिप्पण्या