महिलांना मिळणार दरमहा 1500, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना नेमकी काय ?
Mukhyamantri Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतील अश्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा त्यांनी केली.
या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना सरकार दरमहा 1 हजार 50 रुपये देणार आहे.महिलांना पोषण आहार, रोजगार, कौशल्य यासाठीच्या योजना राबवली जाणार आहे. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कोणत्या महिलांना लाभ मिळणार ?
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील.
21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलेच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जाणार.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू होणार आहे
महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेल्या योजनेच्या आधारे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” नावाची योजना मुली आणि महिलांसाठी राबवली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभेत घोषणा केली की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (सीएम माय डियर सिस्टर)” या योजनेअंतर्गत सर्व महिलांना दर महिन्याला ₹1500 दिले जातील. ही योजना जुलै 2024 पासून लागू होईल असे अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले आहे.
0 टिप्पण्या