T20 विश्वचषक स्पर्धेत रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला.



डिजिटल गावकरी

दुर्गाप्रसाद घरतकर

क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टी-20 वर्ल्डकपकडे लागल्या आहेत. येत्या 2 जूनपासून T20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. तर 9 जून रोजी भारत-पाकिस्तान मेगा मॅच होणार आहे.

चाहत्यांना वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T20 वर्ल्ड कपचे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार या अॅपवर पाहता येणार आहे.

T20 विश्वचषक भारतीय संघ खेळाडू

रोहित शर्मा(कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), विराट कोहली, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू-शुभमन गिल, आवेश खान, रिंकू सिंग, खलील अहमद हे राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या