पाइपलाइन करण्यासाठी शासनाकडून सबसिडी जाहिर pvc pipe subsidy 2024




शेतकऱ्यांना शेतात पाईपलाईन करण्यासाठी आवश्यक असलेल्या पीव्हीसी पाईपसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदान मिळत आहे pvc pipe subsidy 2024 या योजनेविषयी माहिती जाणून घ्या व तूम्ही सुद्धा यासाठीच फॉर्म भरून घ्या.

शेतकऱ्यांना शेतात पाणी वागण्यासाठी खूप अडचणी येत असतात बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन वेगवेगळ्या गट नंबरमध्ये असते. अशावेळी विहीर एका गटात असेल तर दुसऱ्या गटातील शेतामध्ये पाणी नेणे शक्य होत नाही. कुणाकडे पाईप घेण्यासाठी पैसै नसतात त्यामुळे त्यानं शेती करण्यासाठी शासनाकडून pvc पाईप सबसिडी जाहिर करण्यात आली आहे.

पीव्हीसी पाईपसाठी किती मिळते अनुदान pvc pipe subsidy 2024

PVC Pipe subsidy संदर्भात पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत जास्तीत जास्त ३० हजार रुपये एवढी सबसिडी मिळते.

पीव्हीसी पाईप अनुदान pvc pipe subsidy 2024 मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज Mahadbt web portal शेतकरी करू शकतात.

Pvc Pipe subsidy 2024 शेतकरी लाभार्थी पात्रता

बिरसा मुंढा कृषी क्रांती योजना अंतर्गत हे अनुदान मिळते. अनुदान मिळविण्यासाठी लाभार्थी पात्रता अशी आहे.

लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.

लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे.

जमिनीचा सातबारा व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.

लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाखाच्या मर्यादेत असावी.

जमीन कमीत कमी २० गुंठे व व जास्तीत जास्त ६ हेक्टरपेक्षा जास्त नसावी.

या योजनेसाठी करा ऑनलाईन अर्ज

अर्ज करण्याची वेबसाईट


https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

Maha dbt या शेतकरी वेबपोर्टलवर लॉगीन करा.

अर्ज करा या लिंकवर क्लिक करा.

सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा.

या ठिकाणी एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या