उत्पन्न प्रमाणपत्र ऑनलाइन आणि ऑफलाइन कसे मिळवायचे?
डिजिटल गावकरी
दुर्गाप्रसाद घरतकर
केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवतात ज्यासाठी उत्पन्नाची अट निश्चित केलेली असते. विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि शिष्यवृत्तीसाठी नागरिकांना वार्षिक उत्पन्नाची मर्यादा पूर्ण करणे आवश्यक आहे.
शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनाही अनेक सरकारी योजना आणि शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचा दाखला हा महाविद्यालयात जमा करावा लागतो.
आणि त्यामूळे आपण उत्पन्न प्रमाणपत्र हे घरबसल्या कसे मिळवायचे याबद्दल माहिती या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत.
उत्पन्न प्रमाणपत्र कुठे मिळते ?
उत्पन्न प्रमाणपत्र हे आपण आपल्या जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील सेतू केंद्रातून उत्पन्न प्रमाणपत्र मिळवू शकता.
पर्यायीपणे, आपण ते महाराष्ट्र सरकारच्या 'आपले सरकार' पोर्टलद्वारे ऑनलाइन देखील मिळवू शकता.
उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड)
अर्जदाराचा फोटो
पत्ता पुरावा (ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, पाणी बिल, वीज बिल, ७/१२ किंवा ८-अ उतारा)
वैद्यकीय प्रमाणपत्र (जर वैद्यकीय कारणास्तव उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक असेल)
स्वयंघोषणापत्र
उत्पन्न दाखवणारी कागदपत्रे (जसे की मंडल अधिकाऱ्याचा तपासणी अहवाल, प्राप्तिकर परतावा दाखला, निवृत्त पेन्शनधारकांसाठी बँक प्रमाणपत्र, नोकरदारांसाठी फॉर्म 16, शेतकऱ्यांसाठी ७/१२ आणि ८-अ उतारा)
उत्पन्नाचा प्रमाणपत्र ऑनलाइन काढण्यासाठी आपले सरकार' पोर्टलद्वारे अर्ज कसा करायचा
1. पहिल्यांदा आपले सरकार' च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
https://www.maharashtra.gov.in
2. लॉगिन करा आणि "महसूल सेवा" निवडा.
3. "उत्पन्न प्रमाणपत्र किंवा मिळकत प्रमाणपत्र" पर्याय निवडा.
4. आवश्यक कागदपत्रांची यादी वाचा आणि ती वेबसाइटवर अपलोड करा.
5. अर्जासाठी आवश्यक माहिती भरा, जसे की किती वर्षांचा दाखला हवा आहे आणि त्याचे कारण.
6. जर तुम्ही तलाठी उत्पन्न दाखला जोडत असाल तर "तलाठी अहवाल" निवडा.
7. सर्व कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. (प्रत्येक कागदपत्राचा आकार 75 ते 500 KB पर्यंत असावा.)
8. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा आणि पावती जतन करा.
9. "अर्ज सादर करा".
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर हे प्रमाणपत्र कधी मिळेल ?
आपण 'आपले सरकार' पोर्टलद्वारे अर्ज केल्यास, तुम्हाला 21 दिवसांच्या आत प्रमाणपत्र मिळेल.
काही तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र वेळेत मिळालं नाही तर तुम्ही 15 दिवसांनंतर पोर्टलवर पुन्हा लॉगिन करून अपील अर्ज दाखल करू शकता.
FAQ : उत्पन्न दाखलाविषयी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे
प्रश्न : उत्पन्नाचे प्रमाणपत्र कस काढतात ?
उत्तर : शासनाच्या आपले सरकार या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करून आपण घाबसल्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढू शकतो. तसेच तहसील कार्यालयात जाऊनही अर्ज करून
उत्पन्नाचे प्रमाणपत्र आपण मिळवू शकतो.
प्रश्न : उत्पन्नाचा दाखला कुठे मिळतो ?
उत्तर : तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा आपले सरकार पोर्टल वर उत्पन्नाचा दाखला मिळतो.
प्रश्न : आपले सरकार या पोर्टलवर किती दिवसात उत्पन्नाचा दाखला मिळतो ?
उत्तर : आपले सरकार या पोर्टलवर उत्पन्नाचा दाखला घरबसल्या 15 ते 21 दिवसात मिळतो.
प्रश्न : उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे काय?
उत्तर : नागरिकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्ठी करून शासनाकडून जे प्रमाणपत्र दिले जाते त्याला उत्पन्न प्रमाणपत्र म्हणतात.
0 टिप्पण्या