३०० रुपये गॅस सबसिडीसाठी eKYC: आनि त्याची पूर्ण माहिती
डिजिटल गावकरी
दुर्गाप्रसाद घरतकर
भारत सरकारने ३०० रुपये गॅस सबसिडी मिळवण्यासाठी eKYC (इलेक्ट्रॉनिक-नो-योर-कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे.ekyc करणे अंत्यंत महत्वाची आहे. ही ekyc कशी करायची आणि कोठे करायची ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
जर तुमच्या घरात LPG गॅस नसेल तर शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना अंतर्गत महिलांना मोफत LPG गॅस वितरीत करण्यात येत आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती वाचा.
eKYC काय आहे?
eKYC हा एक ऑनलाइन प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करू शकता. हे गॅस सबसिडीसाठी तुमची ओळख सत्यापित करण्यासाठी आवश्यक आहे.
तुम्हाला eKYC करणे का आवश्यकच आहे?
जर तुम्हाला ३०० रुपये गॅस सबसिडी हवी असेल तर तुम्हाला eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
eKYC पूर्ण केल्याने तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात थेट जमा होईल.
eKYC मुळे गॅस सबसिडी घोटाळे रोखण्यास मदत होते.
eKYC करा नाहीतर LPG गॅस सबसिडी होणार बंद HP गॅस eKYC करणे आवश्यक
eKYC करण्यासाठी तुम्हाला https://www.mylpg.in/ या वेबसाईटवर जायचे आहे.
आता याठिकाणी तुम्हाला ३ गॅस सिलेंडर दिसेल. यापैकी तुमचा गॅस ज्या कंपनीचा असेल त्या कंपनीच्या गॅस सिलेंडर वर क्लिक करा.
सिलेंडरवर टच केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपेन होईल. या पेजच्या उजव्या बाजूला तुम्हाला दोन पर्याय दिसेल sign in आणि new user.
जर याठीकाणी तुमची नोंदणी पहिलेच झालेली असेल तर sign in या पर्यायावर क्लिक करा.
आता याठिकाणी तुम्हाला तुमचा १७ अंकी LPG क्रमांक टाकायचा आहे. त्याखाली मोबईल क्रमांक कॅपच्या टाका आणि proceed या बटनवर क्लिक करा.
लॉगीन झाल्यानतर डाव्या बाजूला काही पर्याय दिसेल त्यापैकी शेवटचा aadhar authentication यावर क्लिक आर.
आता याठीकानी एक कॅपच्या भरा त्यानंतर generate OTP या पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या आधार क्रमांकावर एक otp पाठविल्या जाईल तो otp या चौकटीमध्ये टाका आणि खालच्या authenticate या बटनावर टच करा.
आता तुम्हाला एक authentication successfully अस message दिसेल.
ही पद्धट HP सिलेंडरसाठी आहे.
भारत गॅस ekyc
जर तुम्हला भारत गॅसची ekyc करायची असेल तर यासाठी तुम्हाला काही hello BPCL आणि aadhar FaceRd हे दोन app डाउनलोड करावे लागणार आहे.
यासाठी तुम्हाला गॅस कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक लागणार आहे. तुम्ही ही ekyc तुमच्या जवळच्या csc केंद्रातून सुद्धा करू शकता.
indian गॅसची ekyc.
indiaOil हे app डाउनलोड करा.
eKYC पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
* आधार कार्ड
* बँक पासबुक
* रजिस्टर्ड मोबाइल नंबर
तुम्हाला अजून काय माहिती हवी असल्यास तुम्ही
[https://www.mylpg.in/](https://www.mylpg.in/) ला भेट देऊ शकता.
तुम्ही 1800-266-3300 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.
तुम्ही तुमच्या गॅस वितरकाला भेटून अधिक माहिती मिळवू शकता.
0 टिप्पण्या