रमाई आवास योजना 2024 | Ramai Gharkul Yojana Maharashtra


रमाई घरकुल आवस योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कसा करायचा, कोठे करायचा आणि यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे

ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेताना अडचण येणार नाही.या योजनेचे नाव रमाई घरकुल आवस योजना असे आहे. ही योजना ग्रामविकास व गृहनिर्माण या विभागातर्फे राबविली जाते.

रमाई घरकुल योजना: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी घरकुल योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे जी राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत करते. या योजनेचा मुख्य उद्देश सदैव घरविहीन असलेल्या किंवा कच्चे, धोकादायक घरं असलेल्या लोकांना पक्के घर उपलब्ध करून देणे आहे.

रमाई घरकुल योजनेचे फायदे अनुुुदान


अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत (₹1,32,000 ते ₹2.50 लाख पर्यंत)

रमाई घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे

1.लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे

2.अनुसूचित जात किंवा नवबौद्ध घटकाचा सदस्य असणे आवश्यक आहे

3. लाभार्थी हा 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणे आवश्यक आहे


4. लाभार्थी स्वतःचे घर नसणे किंवा कच्चे, धोकादायक घर असणे आवश्यक आहे

5. कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ₹1 लाख पेक्षा कमी असणे

6. लाभार्थ्यांनी इतर कोणत्याही घरेलू निवास योजनेचा लाभ घेतलेला नसणे

रमाई घरकुल योजना साठी अर्ज कसा करायचा

रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येतो.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
https://sjsa.maharashtra.gov.in

या वेबसाइटवर करता येतो.

ऑफलाइन अर्ज करायचे असेल तर जवळच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातून करता येतो.

रमाई घरकुल योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

लाभार्थ्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदान कार्ड.

शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.

Cast certificate.

लाभार्थ्यांचे पासपोर्ट साईज फोटो.

जो लाभार्थी या योजनेचा लाभ घेणार आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा (मागील 15 वर्षापासून).

स्टॅम्प पेपर.

जॉइंट बँक अकाउंट.

वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.

कर पावती.बीपीएल.

इत्यादी कागदपत्रे या योजनेसाठी लागतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या