भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये कोण मारणार बाजी काँग्रेस की भाजपा


डीजीटल गावकरी न्युज
दुर्गा‍प्रसाद घरतकर

भंडारा-गोंदिया : हा ‘दिग्गजांना पराभूत’ करणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यावेळी लोकसभेमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पातळीवरील पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच या मतदारसंघात लढत होत आहे. राष्ट्रवादीचे नेते व गोंदिया जिल्ह्याचे माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांची साथ मिळाल्याने भाजपचे प्रचार अधिक सोपे झाल्याचे पाहायला मिळतात आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये १९ एप्रिल रोजी मतदारसंघात मतदान असून प्रचार शिगेला पोहचला आहे. या लोकसभेमध्ये एकूण १८ उमेदवार मतदानाच्या रिंगणात उभ्या आहेत. भाजपचे सुनील मेंढे महायुतीचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे हे रिंगणात आहेत. अधिकृत उमेदवाराविरुद्ध भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील असंतोषांनी बंड पुकारले. भाजपचे संजय कुंभलकर हे बसपच्या तिकिटावर तर काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये हे दोघे अपक्ष निवडणूकमध्ये उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडी मध्ये संजय केवट या उमेदवाराला संधी दिली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मात्र सुनील मुंडे यांनी डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा प्रचार मोठ्या जोमात सुरू असलेला दिसून येत आहे आतापर्यंत भाजपा कडून नरेंद्र मोदी जे . जे .पी नड्डा नितीन गडकरी इत्यादी मोठे राजकीय नेते प्रचाराला येऊन गेलेले आहेत आहेत.

सुनील मेंढे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी व शिंदे गट उभा आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्याचा फायदा सुनील मेंढे यांना होऊ शकतो असे सांगितले जात आहे . पण मेंढे यांनी मागील पाच वर्षात या मतदारसंघात विकासकामे केलेली नसल्याने मतदारांचा त्यांच्यावर रोष पाहायला मिळते आहे. जरी खासदार म्हणून निवडून आल्यावरही मेंढे यांनी भंडारा नगरपरिषदेचे अध्यक्षपद न सोडल्याने पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. मेंढे यांना मोदी लाट आणि पटेलांची साथ यामुळे यावेळीही त्यांची नौका पार होऊ शकते अशी शक्यता आहे.

महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्या निमित्ताने तब्बल २५ वर्षांनंतर मतदारसंघात काँग्रेसचे पंजा हे चिन्ह पहायला मिळते. यामुळे त्यांना काँग्रेसची पारंपरिक मते त्यांना मिळू शकतात. मात्र महविकास आघाडी पक्षाचे जुने आणि मोठे योगदान देणारे अनेक कार्यकर्ते इच्छुक रांगेत असताना त्यांच्या तुलनेने नव्या उमेदवाराला पडोळे यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने आघाडीचे जुने कार्यकर्ते दुखावले आहेत यापासून काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी बंडखोरी करीत काँग्रेसच्याच उमेदवाराला आव्हान दिले आहे. हे करताना त्यांनी प्रशांत पडोळे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेक आरोप केलेले आहेत . भंडारा जिल्ह्यातील अडचणीच्या काळात मीच पक्ष सांभाळला, असा दावा वाघाये पाटील करत आहेत.

निष्ठावंतांची नाराजी बघता आता नाना पटोले हे काँग्रेसचे पडोळे यांना कसे जिंकवतील हा प्रश्न आहे.
त्याचबरोबर बसपचे उमेदवार संजय कुंभलकर आणि वंचितचे संजय केवट हे कोणाची मते घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. २०१९ मध्ये वंचितच्या उमेदवाराने ४५ हजार ८४२ तर बसपच्या उमेदवाराने ५२ हजार ६५९ मते घेतली होती. संजय कुंभलकर तेली समाजाचे प्रतिनिधित्व करीत असले तरी समाजाचा कोणताही मोठा नेता त्यांच्यासोबत नाही.
लोकांना मात्र आता मतदानाची भुरळ लागलेली आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये गोंदिया भंडारा मतदारसंघात कोण निवडून येणार आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या