आज साकोली येथे राहूल गांधीं यांची भव्य जाहिर सभा संपन्न मोदींवर साधाला निशाणा


डिजिटल गावकरी न्युज
दुर्गाप्रसाद घरतकर 

भंडारा:  आज विदर्भातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस न्याययोद्धा श्री. राहुलजी गांधी यांची भव्य सभा सेंदुरवाफा/साकोली येथे पार पडली.
यावेळी राहूल गांधींनी मोदींवर निशाणा साधत महिलांसाठी काही घोसणा केल्या त्यामधे ते म्हणाले की प्रत्येक गरीब  घरातील एका महिलेला दरवर्षी 1 लाख रुपये त्यांच्या खात्यात दिले जातील जेणेकरून त्यांना त्या पैशाचा वापर आपल्या स्वतःच्या करियर साठी उपयोगात आणता येईल.

त्याचबरोबर समान नौकरी व समान पगार महिलाना देण्यात येईल कोणताही भेदभाव केला जाणार नाही असेही ते म्हणाले व महिलांना सुरक्षित कार्यस्थल, कामगार महिलांच्या छात्रावास, मुलांची देखभाल, मातृत्व लाभ आणि सुरक्षित परिवहन सोबत काम करण्यास त्यांना संधी दीली जाईल अशी ग्वाही राहूल गांधींनी या सभेमध्ये दिली.

यावेळी या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.श्री. नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते मा.श्री.बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते मा.श्री.विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. जयंत पाटील, खासदार मा.श्री.चंद्रकांत हंडारे, गोव्याचे प्रभारी मा.श्री.माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.आशिष दुआ, माजी मंत्री मा.श्री.सतीष चतुर्वेदी, भंडारा गोंदिया लोकसभेचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे गडचिरोली चिमूरचे काँग्रेस उमेदवार ड़ॉ. नामदेव किरसन, नागपूरचे उमेदवार मा.श्री.विकास ठाकरे, चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. कुणाल जी राऊत यांच्यासह विदर्भातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते या मोठ्या जाहीर सभेला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या