अभिलेख विभागातर्फे ऑनलाइन पद्धतीने मोजता येणार जमीन
अभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरातूनच जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे.
सातबाऱ्यावरून शेतकऱ्यांची जमीन किती आहे, हे समजते.
जमीन मोजणीचे तीन प्रकार
1. साधी मोजणी : सहा महिन्यांच्या कालावधीत केली जाते.
2.तातडीची मोजणी : तीन महिन्यांपर्यंत करावी लागते.
3.अतितातडीची मोजणी दोन महिन्यांच्या आत केली जाते.
अनेकदा सातबाऱ्यावर अन उपअधीक्षक भूमी अभिलेख विभागात करा अर्ज असे आहेत दर आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये तफावत आढळते. अशावेळी शासकीय पद्धतीने मोजणी करून घेणे हा चांगला पर्याय असून त्यासाठी शेतजमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो.
जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा पाहा
जमीन मोजणीसाठी अर्ज आणि त्याला लागणारी कागदपत्रे आपल्याला आपल्या शेत जमिनीची आणि त्याबाबत शंका निर्माण झाल्यास आपण यासाठी सरकारी कार्यालयाकडे दाद मागू शकतो. यासाठी शेतकरी भूमिअभिलेख विभागाच्या तालुकास्तरावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन कार्यालय यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
वेबसाईटवर जमीन मोजणीसाठी अर्ज असे करायचे
पहिल्यांदा तुम्हाला या
bhumiabhilekh.maharashtra.gov.in वेबसाईट वर जायचे आहे.
यामध्ये सुरुवातीला तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करणार आहात त्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव टाकावे लागते.
पहिल्या पर्यायापुढे अर्जदाराने आपले संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी माहिती भरावी. यात अर्जदाराचे नाव, गावाचे नाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव आवश्यक असते.
मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील हा दुसरा पर्याय असतो. यातील मोजणीच्या प्रकारासमोर कालावधी आणि उद्देश लिहावा लागतो.
त्यापुढे पुन्हा तालुक्याचे नाव, गावाचे नाव, शेत जमीन ज्या
गट क्रमांकात येते गट क्रमांक गरजेचा असतो.
एक हेक्टर साधी मोजणी करायची असल्यास एक हजार रुपये फी लागतात
तातडीच्या मोजणीसाठी दोन हजाार
आणि अति तातडीची मोजणीसाठी तीन हजार रुपये आकारले जातात.
फी जमा केल्यानंतर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने कार्यालयात स्वीकारला जाईल व आपला मोजणी रजिस्टर क्रमांक मोजणीची तारीख, मोजणी करून देणारे कर्मचारी व त्यांचे मोबाईल नंबर आपल्या मोबाईल फोन वर मॅसेज द्वारे पाठवले जाईल.
जमीन मोजणी केलेल्या कामाची स्थिती पाहण्यासाठी ह्या वेबसाईटला भेट द्यावे लागेल.
https://emojni.mahabhumi.gov.in/citizensite/pgLogin.aspx
त्यामुळे किती कालावधीत तुम्हाला मोजणी करून घ्यायची ते आवश्यक आहे.
■ तिसरा पर्याय सरकारी खजिन्यात भरलेल्या मोजणी फी
ची रक्कम याबाबत सविस्तर तपशील सादर करावा लागतो. त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहावे लागेल.
■ अभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यालाच ई-मोजणी असे म्हटले जाते.
0 टिप्पण्या