डिजिटल गावकरी न्युज
Bhandara Gondia Loksabha Political News येत्या २०२४ चा लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत. पण पक्षाच्या वरिष्ठांनी गुप्त बैठकांचा सपाटा लावला आहे. दररोजच्या बैठकांमध्ये उमेदवारी कोणाला द्यावी, याबाबत चर्चा होत असून ‘विनिंग’ उमेदवार देण्यासाठी पक्षाचा विचार सुरू आहे .
भाजपा पक्षाला मात देत येणारी लोकसभा बहुमताने काबीज करण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. काँग्रेसचा हा मास्टर प्लॅन यात महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी डिजिटल गावकरीला कळली आहे. दरम्यान, येणारी लोकसभा निवडणूक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात लढण्याची तयारी काँग्रेस पक्षाने जोरात सुरु केली आहे.
आता चर्चामध्ये असलेले भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव निश्चित झाले आहे. त्याचबरोबर यादीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांचेही नाव त्या उमेदवारांच्या यादीत आहे. स्वतः पक्षाचे शिलेदार काँग्रेस हायकमांड खासदार राहुल गांधी यांनी ही नावे निश्चित केल्याचे सूत्र सांगतात.
गेल्या काही दिवसांपासून नाना पटोलेंनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत जातीने लक्ष देण्यात सुरुवात केली आहे. नानांनी स्वतः नेतृत्व करत तीन ते १३ सप्टेंबर या काळात गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत संकल्प पदयात्रा काढली होती.या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या लोकसभा मतदारसंघावर विजय मिळविण्यासाठी नानांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या गोंदिया भंडारा मतदारसंघांमध्ये नाना पाटोळे यांच्या वर्चस्व कायम दिसून येत आहे नाना पाठवले हे जनसामान्याबद्दल राहणारे लोकनेते आहेत त्यांनी या क्षेत्रासाठी खूप विकास कामे केलेली आहेत त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांच्या त्यांवर असलेला विश्वासा असे निश्चित करते किती या लोकसभा निवडणूक मध्ये जिंकून येण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या