चरणभाऊ वाघमारे लढणार गोंदिया भंडारा लोकसभेची निवडणूक

Image source: Facebook -MLA Charanbhau Waghmare 
 
डिजिटल गावकरी न्युज
दुर्गाप्रसाद घरतकर 

गोंदिया भंडारा लोकसभा निवडणूक 2024 : मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली गेली आहे मात्र लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसला अद्यापही भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार न मिळाल्याची माहिती समोर आली आहे. किंबहुना भाजपला भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात टक्कर देईल, असा उमेदवार अजूनही सापडला नसल्याची चर्चा आहे.

काँग्रेस एखाद्या नेत्याला काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करून उमेदवारी देणार असल्याची चर्चा भंडारा कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे या सर्व घडामोडींत बीआरएसचे नेते माजी आमदार चरण वाघमारे यांना लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडून माजी आमदार चरण वाघमारे यांना कॉल करत त्यांची मन धरणी सुरू झाल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीला पर्यायाने काँग्रेसला भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निश्चित करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत यामध्ये भाजपकडून विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांचे नाव समोर येत आहे. ही बाब लक्षात घेता काँग्रेसला याला टक्कर देणारा नेता पाहिजे आहे ही बाब लक्षात घेता काँग्रेसकडे आलेल्या इच्छुकांच्या यादीत भाजपला टक्कर देईल, असा उमेदवारच नसल्याचे महाविकास आघाडीच्या बैठकीत समोर आले आहे. ही बाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगले जाणत असल्यामुळे त्यांच्याकडूनही माजी आमदार चरण वाघमारे यांना 'कॉल' आल्याचे सांगण्यात येत आहे..

गोंदिया भंडाऱ्यामध्ये चरण वाघमारे हा नाव खूप गाजलेला आहे त्यांनी केलेले विकास कामे आणि त्यांचा रुबाब त्यांच्या कामातून आजपर्यंत लोकांना दिसलेला आहे ती मोठ्या ठाम विचारांचे आहे. गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये त्यांना लोक मानत आहेत त्यांच्यावर यांचा विश्वास आहे मित्रांनो एका सोशल मीडिया मुलाखतीमध्ये चरण भाऊ वाघमारे यांनी असे म्हटले आहे की जर गोंदिया जिल्ह्यातील लोक जर मला ठामपणे मदत करण्यास तयार असतील तर मी लोकसभेची निवडणूक लढायला नक्की तयार आहे आणि जिंकायला तयार आहे असे चरण भाऊ वाघमारे यांनी म्हटले आहे.
जर चरणभाऊ वाघमारे यांनी लोकसभेची निवडणूक या जिल्ह्यात लढवली तर भाजपाला मात्र ही निवडणूक हरवल्याशिवाय राहणार नाही असे जिल्ह्यातील लोकांचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या